Pune Crime News : विभक्त महिलेशी लगट करण्याचा प्रयत्न; अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल

पतीपासून विभक्त राहत असलेल्या महिलेच्या एकटेपणाचा फायदा घेत तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात विनयभंग मारहाण आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Tue, 10 Oct 2023
  • 03:29 pm
Pune Crime News

संग्रहित छायाचित्र

पुणे : पतीपासून विभक्त राहत असलेल्या महिलेच्या  एकटेपणाचा फायदा घेत तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात(Koregaon Park Police Station)  विनयभंग (molestation)मारहाण आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा(FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ८ ऑक्टोबर रोजी रविवारी दुपारी साडेचार ते पाच वाजण्याच्या दरम्यान कोरेगाव पार्क येथील 'प्लंज बार अँड रेस्टॉरंट'मध्ये घडला.

संतोष वामनराव भरेकर, त्याची पत्नी स्नेहल संतोष भरेकर, मित्र राहुल शिवाजी जाधव आणि आणखी एक अनोळखी व्यक्तीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी २५ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. ही तरुणी विश्रांतवाडी परिसरात राहते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणीचे कौटुंबिक वाद आहेत. त्यामुळे ती पतीपासून विभक्त राहते. तिची संतोष आणि राहुल या दोघांसोबत ओळख झाली होती. त्यानंतर त्यांची मैत्री झाली. आरोपींनी ही महिला दलित असल्याचे माहित असताना देखील तिच्या एकटेपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला.

संतोष याने तिच्यासोबत लगट करण्याचा प्रयत्न केला. तिच्या मनाविरुद्ध अंगाला स्पर्श करून शारीरिक संबंध ठेवण्याची जबरदस्ती केली. शारीरिक संबंध न केल्यास बदनामी करण्याची धमकी दिली. यासंदर्भात त्याची पत्नी स्नेहल हिला कल्पना दिली असता या सर्वांनी मित्र-मैत्रिणींसोबत होत असलेल्या पार्टीमध्ये पिडीत महिलेला हाताने मारहाण केली. तसेच, त्यांना जातीवाचक शिवीगाळ करून विनयभंग केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest