संतापजनक! ख्राईस्ट चर्चमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न

आपल्या आईसह प्रार्थनेसाठी चर्चमध्ये गेलेल्या सहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा प्रकार रविवारी सकाळी साडेआठ ते साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान ख्राईस्ट चर्च येथे घडला. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Tue, 12 Sep 2023
  • 01:47 pm
sexual assault

ख्राईस्ट चर्चमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न

पुणे : आपल्या आईसह प्रार्थनेसाठी चर्चमध्ये गेलेल्या सहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा प्रकार रविवारी सकाळी साडेआठ ते साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान ख्राईस्ट चर्च येथे घडला. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहित संजय पारधी (वय २१, कोंढवा खुर्द) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या ३४ वर्षीय वडिलांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी सहा वर्षांची आहे. ती तिच्या आईसह क्राईस्ट चर्चेमध्ये प्रार्थनेसाठी गेलेली होती. त्यावेळी आरोपी रोहित याने तिला बळजबरीने स्वच्छतागृहात कोपऱ्यात नेले. त्याने स्वतःचे लैंगिक अवयव तिला दाखवून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तिथून ही मुलगी कशीबशी सुटका करून पळाली आणि तिने याबाबत घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर आरोपी रोहितला उपस्थितांनी चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले. पुढील तपास समर्थ पोलीस करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest