Pune Crime News : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला कोटीचा गंडा घालण्याचा प्रयत्न; ठेकेदारावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा

पुणे : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला तब्बल एक कोटी रुपयांचा गंडा घालण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बनावट बँक गॅरंटी सादर करून फसवणुकीचा(Fraud) हा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यामध्ये(Bundagarden police ) ठेकेदारा विरोधात (Pune Crime News) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Sat, 21 Oct 2023
  • 09:11 am
Pune Crime News

संग्रहित छायाचित्र

पुणे : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला (maharashtra jeevan pradhikaran) तब्बल एक कोटी रुपयांचा गंडा घालण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बनावट बँक गॅरंटी सादर करून फसवणुकीचा(Fraud) हा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यामध्ये(Bundagarden police ) ठेकेदारा विरोधात (Pune Crime News) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार डिसेंबर २०२२ ते आज रोजी पर्यंत घडला.

बाबासाहेब जयवंत समत (वय ५२, रा. शेवगाव, अहमदनगर) असे आरोपीचे नाव आहे ). याप्रकरणी उपविभागीय अभियंता श्रीकांत मधुकर राऊत (वय ५७)  यांनी फिर्याद दिली आहे. राऊत हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण टिळक रोड क्षेत्रीय कार्यालय या ठिकाणी उपविभागीय अभियंता म्हणून काम करतात. हा सर्व प्रकार महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयात घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबासाहेब समत हा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा ठेकेदार आहे. त्यांनी वडगाव रासाई, सादलगाव येथील पाणीपुरवठा योजनेसाठीच्या रेट्रो फिटिंगच्या कामाची निविदा काढलेली होती. ही निविदा समत याने भरलेली होती.

प्राधिकरणाने या निविदेची किंमत एक कोटी तीन लाख ३६ हजार ३८ रुपये ठेवलेली होती. ही निविदा भरल्यानंतर निविदा प्रक्रियेमधून हे काम बाळासाहेब समत याला मिळाले. नियमानुसार त्याने बँक गॅरंटी देणे बंधनकारक होते. आरोपीने त्याकरिता त्याच्या बँक खात्यामध्ये एक कोटी १४ लाख ६८ हजार १६८ रुपये असणे आवश्यक होते. समत याने खोटे आणि बनावट बँक गॅरंटी पत्र तयार केले. आपल्या खात्यामध्ये कोट्यावधी रुपये असल्याची त्याने बतावणी केली. शासनाची फसवणूक करण्याचे उद्देशाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे हे पत्र सादर केले. त्याद्वारे प्राधिकरणाकडून एक कोटी ३३ हजार ६०४ रुपये स्वतःच्या बँक खात्यात जमा करून घेण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात बंडगार्डन पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यावरून पोलिसांनी तपास करून गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मधाळे करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest