ACB Trap : २५ हजारांची लाच घेताना सहायक फौजदार एसीबीच्या जाळ्यात

तक्रारीवरून गुन्हा दाखल न करण्यासाठी महिलेकडून २५ हजारांची लाच (Bribe) घेताना सांगवी पोलीस ठाण्यातील (Sangvi Police) सहायक पोलीस फौजदार लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकला. पोलीस चौकीमध्ये लाच घेताना त्याला पकडण्यात आले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Thu, 19 Oct 2023
  • 09:19 am
ACB Trap

संग्रहित छायाचित्र

याप्रकरणी ४५ वर्षीय महिलेने एसीबीकडे केली होती तक्रार

तक्रारीवरून गुन्हा दाखल न करण्यासाठी महिलेकडून २५ हजारांची लाच (Bribe) घेताना सांगवी पोलीस ठाण्यातील (Sangvi Police) सहायक पोलीस फौजदार लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकला. पोलीस चौकीमध्ये लाच घेताना त्याला पकडण्यात आले आहे.

सहायक फौजदार सुनील शहाजी जाधव (वय ४९, नेमणूक सांगवी पोलीस ठाणे) असे रंगेहाथ पकडलेल्या सहायक फौजदाराचे नाव आहे. याप्रकरणी ४५ वर्षीय महिलेने एसीबीकडे तक्रार दिली आहे.

एसीबीच्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेच्या घराचे बांधकाम पिंपळे सौदागर येथे सुरु आहे. या बांधकामाचे कॉन्ट्रॅक्ट बांधकाम व्यवसायिक कराळे यांना दिले होते. घराच्या बांधकामाबाबत कॉन्ट्रॅक्टर कराळे व तक्रारदार यांच्यात करार झाला होता. करारानुसार बांधकाम व्यवसायिक यांनी काम वेळेत पूर्ण केले नाही. तसेच तक्रारदारांच्या ताब्यातील बांधकामाचे साहित्य कॉन्ट्रॅक्टर  मागत होते. बांधकाम पूर्ण झाल्यावर हे साहित्य देण्यात येईल असे तक्रारदारांनी कॉन्ट्रॅक्टरला सांगितले.

त्यानंतर कॉन्ट्रॅक्टर कराळे यांनी तक्रारदारांच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीवरून तक्रारदार महिलेच्या विरुद्ध कारवाई न करण्यासाठी व गुन्हा दाखल न करण्यासाठी सहायक फौजदार जाधव यांनी प्रथम ६० हजार रुपयाची लाच मागितली. त्यानंतर तडजोडी करून ५० हजारांची लाचेची मागणी केली. तसेच ही लाच रक्कम दोन टप्प्यात देण्यास सांगितले

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest