Pune Crime News : पत्नीकडून पतीवर प्राणघातक हल्ला; पुण्यातील धक्कादायक प्रकार

कौटुंबिक वादामधून पत्नीने पतीला जोरात ठोसा मारल्याने पती जागेवरच बेशुद्ध झाला. त्याच्या नाकाचे आणि तोंडाचे हाड फ्रॅक्चर झाले असून भरपूर रक्तस्त्राव झाला आहे. गंभीर जखमी झालेल्या या व्यावसायिकाला रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

Pune Crime News

संग्रहित छायाचित्र

पुणे : कौटुंबिक वादामधून पत्नीने पतीला जोरात ठोसा मारल्याने पती जागेवरच बेशुद्ध झाला. त्याच्या नाकाचे आणि तोंडाचे हाड फ्रॅक्चर झाले असून भरपूर रक्तस्त्राव झाला आहे. गंभीर जखमी झालेल्या या व्यावसायिकाला रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, हा पती जिवंत आहे की मृता अवस्थेत आहे याबाबत डॉक्टरांकडून अद्याप कोणतीही माहिती समजलेली नसल्याचे वानवडी पोलीस (wanvadi Police) ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी 'सिविक मिरर'शी बोलताना सांगितले. (Pune Crime News) 

निखिल पुष्कराज खन्ना (Nikhil Khanna) (वय ३६,रा. ए ५,  गंगा सॅटॅलाइट, वानवडी ) असे या बांधकाम व्यवसायिकाचे नाव आहे. त्यांची पत्नी रेणुका जाखड उर्फ रेणुका निखिल खन्ना (वय ३६) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखिल खन्ना आणि रेणुका यांचा प्रेमविवाह २०१७ साली झालेला आहे. तेव्हापासून ते एकत्र राहतात. खन्ना यांचा रियल इस्टेटचा व्यवसाय आहे. शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हे दोघेच घरामध्ये होते. त्यावेळी कौटुंबिक कारणावरून त्यांच्यामध्ये वाद झाला. या वादाचे पर्यावरण एकमेकांच्या  झटापटीमध्ये झाले. 

रागाच्या भरात रेणुका यांनी निखिल यांच्या नाकावर जोरात ठोसा लगावला. त्यामुळे त्यांच्या नाकाचे आणि तोंडाचे हाड फ्रॅक्चर झाले. त्यातच मोठा रक्तस्त्राव झाल्याने ते बेशुद्ध पडले. याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या मदतीने नातेवाईकांनी त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केले. पोलिसांनी त्यांच्या पत्नीला ताब्यात घेतले असून त्यांच्यावर देखील उपचार सुरू आहेत. त्या मद्याच्या अंमलाखाली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, त्यांनी निखिल यांच्या तोंडावर ठोसा नाही तर कोणती तरी जड वस्तू मारून प्रहार केला असावा असा कयास देखील पोलिसांनी बांधला आहे. पुढील तपास सुरू असल्याचे पतंगे यांनी सांगितले. दरम्यान, यासंदर्भात डॉक्टरांचे ओपिनियन आल्यानंतरच स्पष्टपणे सांगता येईल असे देखील त्यांनी स्पष्ट केले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest