Pune Crime News : दागिने घडवायचे सोने घेऊन कारागीर पसार

दागिने घडवण्यासाठी दिलेले २१ लाख ८० हजार रुपयांचे ३८० ग्रॅम सोने घेऊन कारागीर पसार झाल्याची घटना कॅम्प येथील सेंटर स्ट्रीटवर असलेल्या श्री अंबिका ज्वेलर्समध्ये घडली.

Pune Crime News : दागिने घडवायचे सोने घेऊन कारागीर पसार

संग्रहित छायाचित्र

पुणे : दागिने घडवण्यासाठी दिलेले २१ लाख ८० हजार रुपयांचे ३८० ग्रॅम सोने घेऊन कारागीर पसार झाल्याची घटना कॅम्प येथील सेंटर स्ट्रीटवर असलेल्या श्री अंबिका ज्वेलर्समध्ये घडली. याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यामध्ये संबंधित कारागिराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीमंत शामपदा दास (रा. सोमवार पेठ, मूळ रा. पूर्व मेदनीपूर, पश्चिम बंगाल) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी राजेश गणेशमल कावेडीया (वय ४४, रा. शंकर शेठ रोड) यांनी फिर्याद दिली आहे. कावेडीया यांचे श्री अंबिका ज्वेलर्स नावाचे दुकान कॅम्प परिसरातील भोपळे चौकामध्ये आहे. श्रीमंत श्यामपदा दास हा दागिने घडविण्याचे आणि दुरुस्ती करण्याचे काम करीत होता.

कावेडीया यांच्या दुकानामध्ये आवश्यकतेनुसार त्याला दागिने घडवायचे काम दिले जात होते. २५ फेब्रुवारी २०२३ ते २८ फेब्रुवारी २०२३ या कालावधी दरम्यान कावेडीया यांनी त्याला ३८० ग्रॅम सोने दिले होते. त्याचे दागिने बनवून देण्यास त्याला सांगण्यात आलेले होते. मात्र, या सोन्याचा अपहार करून तो पसार झाला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गायकवाड करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest