तीन वर्ष वास्तव्य बदलून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक

तीन वर्षांपासून आपले वास्तव्य सतत बदलून पोलिसांना गुंगारा देत असलेल्या सराईत गुन्हेगाराला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकने अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीवर चिखली, एमआयडीसी भोसरी, दिघी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

संग्रहित छायाचित्र

विलास बाळशीराम मोरे (वय ३८, रा. दिघी रोड, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. 

गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली पोलीस ठाण्यात सन २०२१ मध्ये दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यात आरोपी विलास मोरे फरार होता. पोलिसांनी त्याच्या साथीदारांना अटक केली होती. मागील तीन वर्षांपासून आरोपी विकास मोरे हा आपले वास्तव्य बदलून राहत होता. त्यामुळे तो पोलिसांना मिळून येत नसे.

गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस अंमलदार बाळु कोकाटे, सोमनाथ बोऱ्हाडे, महादेव जावळे, अजित रुपनवर यांनी तांत्रिक विश्लेषण करून विकास मोरे याचा ठावठिकाणा शोधला. तो फुगे प्रायमा बिल्डींग, भोसरी येथे येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. आरोपी विलास मोरे याच्यावर चिखली, एमआयडीसी भोसरी, दिघी पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest