Murder : कोंढव्यात प्रौढाचा धारदार हत्याराने खून

कोंढवा येथील एका प्रौढाचा धारदार हत्याराने वार करून तसेच गळा चिरून खून (Murder) करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शिवनेरी नगर येथील गव्हाणे क्रीडांगणासमोर असलेल्या पारसी ग्राऊंडवर घडली.

Murder

कोंढव्यात प्रौढाचा धारदार हत्याराने खून

कारण अस्पष्ट : पोलिसांकडून तपासाला सुरुवात

पुणे : कोंढवा येथील एका प्रौढाचा धारदार हत्याराने वार करून तसेच गळा चिरून खून (Murder) करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शिवनेरी नगर येथील गव्हाणे क्रीडांगणासमोर असलेल्या पारसी ग्राऊंडवर घडली. याप्रकरणी कोंढवा पोलीस (Kondhwa Police) ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

शाहनवाज मुनीर सय्यद ऊर्फ बबलू (Shahnawaz Munir Syed alias Bablu) (वय ५५) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.  याप्रकरणी समीर मुनीर सय्यद (वय ४३, रा. ताहिर हाईटस, भाग्योदय नगर, कोंढवा) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. कोंढवा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी समीर हे त्यांची पत्नी सना, आई मुमताज, मुलगा जिदान, मुलगी असीरा यांच्यासह राहण्यास आहेत. ते  सेटालाईट केबल मध्ये नोकरीस आहेत. त्यांचा  मोठा भाऊ शहनवाज उर्फ बबलु हा त्यांच्याच सोयायटीतील तळमजल्यावर पत्नीसह राहण्यास आहे. त्याला दोन मुली असून त्यांचे लग्न झालेले आहे. तो चालक व जमीन खरेदी विक्रीचे काम करीत होता. मागील दोन दिवसांपासून तो घरी आलेला नव्हता.

दरम्यान, सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास त्यांची वाहिनी खुर्शीद घरी आली. त्यांनी 'शाहनवाज याचा रात्री पासुन फोन बंद लागत आहे. तो रविवारी रात्री साडेआठ वाजता जेवणाचे पार्सल घेऊन येतो असे सांगून गेला होता. परंतु, रात्री साडेदहा वाजता सद्दाम हा जेवनाचे पार्सल घेऊन घरी आल्याचे सांगितले. त्याच्याकडे विचारणा केली असता, 'शाहनवाजने घरी पार्सल देण्यास सांगितले होते, असे सांगत तो निघून गेला.  त्यानंतर समीर यांनी त्याच्या मोबाईल नंबर फोन लावला.  तेव्हा त्याचे दोन्ही मोबाईल नंबर बंद लागत होते. त्यानंतर शहनवाज सोबत काम करणाऱ्या साद याला फोन लावला. त्याने देखील शहनवाज कामावर आला नसल्याचे सांगितले.

त्यानंतर समीर हे कामावर जाण्याकरीता निघाले.  शितल पेट्रोलपंपा जवळ आलेले असताना त्यांना मित्र आसिफ शेख यांचा ' फोन आला. त्याने,  'शहनवाज उर्फ बबलु कुठे आहे?' अशी विचारणा केली. त्याकहा रात्री पासुन फोन बंद लागत असुन तो रात्री पासुन घरी आला नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर आसिफ यांनी , बबलु उर्फ शहनवाज याचा शिवनेरी नगर येथील गव्हाने क्रीडांगणा समोर असलेल्या पारसी ग्राऊंडवर खून झाल्याची माहिती दिली. समीर हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तेथे मैदानामध्ये पोलीस अधिकारी आणि बरेच लोक जमलेले होते. त्याठिकाणी शाहनवाज खाली पडलेला होता. पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला ओळखता का असे विचारले. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता तो शाहनवाजच असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या पोटावर उजव्या आणि डाव्या बाजुला कसल्यातरी धारधार हत्यायाने भोसकल्याचे दिसत होते. तसेच,  त्याचा  गळा धारधार हत्याराने चिरलेला होता.  त्यांच्या अंगावरील कपडे रक्ताने माखलेले होते. तो मृतावस्थेत पडलेला  होता. त्याचा मृतदेह पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest