Pune Crime : अल्पवयीन मुलाच्या शरीरात भरली हवा; गुदद्वाराला लावला एअर कॉम्प्रेसरचा चालू पाईप : मुलाचा मृत्यू

फूड प्रोसेसिंग कंपनीमध्ये एक काम करणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलाच्या गुरुद्वाराला एअर कॉम्प्रेसरचा पाईप लावून त्याच्या अंगात हवा भरण्यात आली. या अघोरी प्रकारामुळे या अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू झाला.

Pune Crime

संग्रहित छायाचित्र

पुणे : फूड प्रोसेसिंग कंपनीमध्ये एक काम करणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलाच्या गुरुद्वाराला एअर कॉम्प्रेसरचा पाईप लावून त्याच्या अंगात हवा भरण्यात आली. या अघोरी प्रकारामुळे या अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास हडपसर येथील इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये घडली. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadpsar Police) आरोपीला अटक केली आहे. (Pune Crime News)

मोतीलाल साहू (Motilal Sahu_) (वय १६) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी धीरजसिंग गोपालसिंग गौड (Dheeraj Singh Gopal Singh Goud) (वय २१) याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी शंकरदिन रामदिन साहू (वय ३४, रा. मूळ बडागाव, मध्य प्रदेश) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शंकरदिन आणि त्यांचा भाचा मोतीलाल, आरोपी धीरज सिंग हे तिघेही हडपसर इंडस्ट्रियल एरियामधील पुना फ्लोअर अँड फूड्स या कंपनीमध्ये काम करतात. कंपनीच्या तिसऱ्या मजल्यावर धीरजसिंग हा काम करीत होता. त्यावेळी त्यांच्या चेष्टा मस्करी सुरू होती. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest