Pune Crime News : इमारतीच्या छतावर कोयत्याने वार करीत तरुणाचा खून

फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत सलग दुसऱ्या दिवशी कोणाचा प्रकार घडला आहे. किरकोळ वादामधून तरुणावर कोयत्याने वार करीत खून करण्यात आला. ही घटना गणेश पेठेतील ओसवाल बिल्डिंगच्या छतावर मध्यरात्री घडली.

Pune Crime News : इमारतीच्या छतावर कोयत्याने वार करीत तरुणाचा खून

इमारतीच्या छतावर कोयत्याने वार करीत तरुणाचा खून

पुणे : फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत सलग दुसऱ्या दिवशी कोणाचा प्रकार घडला आहे. किरकोळ वादामधून तरुणावर कोयत्याने वार करीत खून करण्यात आला. ही घटना गणेश पेठेतील ओसवाल बिल्डिंगच्या छतावर मध्यरात्री घडली.

सिद्धार्थ नंदकुमार हादगे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघाजणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,सिद्धार्थ हादगे आणि आरोपींचे वाद झाले होते. आरोपी कोयते घेऊन त्याच्या मागे लागले. तो ओसवाल बिल्डिंगच्या छतावर गेला असता आरोपींनी त्याला एकटे गाठत वार करून खून केला. पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest