Pune Crime : सुरक्षा रक्षकाच्या मानेला लावले हत्यार; दोन घटनांमध्ये मोबाईल व रोकड लुटली

सुरक्षारक्षक म्हणून काम करीत असलेल्या तरुणाच्या मानेवर धारदार हत्यार ठेवत त्याचा मोबाईल लंपास करण्यात आला. ही घटना कोंढवा येथील पेअर कन्स्ट्रक्शन कंपनीच्या साईटवर घडली. याप्रकरणी दोन अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Crime News

सुरक्षा रक्षकाच्या मानेला लावले हत्यार; दोन घटनांमध्ये मोबाईल व रोकड लुटली

पुणे : सुरक्षारक्षक म्हणून काम करीत असलेल्या तरुणाच्या मानेवर धारदार हत्यार ठेवत त्याचा मोबाईल लंपास करण्यात आला. ही घटना कोंढवा येथील पेअर कन्स्ट्रक्शन कंपनीच्या साईटवर घडली. याप्रकरणी दोन अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, हडपसर पोलीस (Hadpsar Police) ठाण्याच्या हद्दीत रस्त्याने जाणाऱ्या तरुणाच्या मानेला हत्यार लावत त्याच्या खिशातून रोकड हिसकावण्यात आली.  (Pune Crime News)

महेश देवराम गायकवाड (वय ३४, रा. इंद्रायणीनगर, कात्रज) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गायकवाड हे मूळचे तुळजापूर तालुक्यातील किरजगाव येथील रहिवासी आहेत. ते सध्या बोपदेव घाटाच्या जवळ सुरू असलेल्या पेअर कन्स्ट्रक्शन कंपनीच्या साईटवर सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. शनिवारी अडीच वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून दोन अनोळखी तरुण तेथे आले. त्यांनी गायकवाड यांच्याकडे वेळ विचारली. पाठीमागे बसलेल्या आरोपीने त्यांच्या मानेवर धारदार हत्यार लावले. धमकावत मोबाईल काढून घेत ते दोघेही पसार झाले.

तर, हडपसर पोलीस ठाण्यात उमर अली पटेल (रा. जुना म्हाडा बिल्डिंग, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, १८ ते २५ वयोगटातील तीन अनोळखी तरूणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना हडपसरच्या ख्वाजा गरीब नवाज मशीदीजवळ घडली. पटेल हे मोटार सायकलवरून जात होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना अडवले. गुपचूप उभे राहण्यास सांगत मानेवर धारदार हत्यार लावले. त्यांच्या  पॅन्टच्या खिशामधील चार हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. कोणाला काही सांगितले तर ठार मारण्याची धमकी दिली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest