Pune Crime : अल्पवयीन मुलीसोबत प्रेमाचे नाटक, खडकवासल्यातील लॉजवर बलात्कार; व्हीडीओ केला व्हायरल

अल्पवयीन मुलीसोबत प्रेमाचे नाटक (drama of love) करीत तिला खडकवासला येथे फिरायला घेऊन जाऊन लॉजवर नेऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध (Rape) प्रस्थापित करण्यात आले. त्याचे व्हीडीओ चित्रीकरण (Video shooting) करून हा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Fri, 20 Oct 2023
  • 04:02 pm
Rape

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून व्हीडीओ केला व्हायरल

अल्पवयीन मुलीसोबत प्रेमाचे नाटक (drama of love) करीत तिला खडकवासला येथे फिरायला घेऊन जाऊन लॉजवर नेऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध (Rape) प्रस्थापित करण्यात आले. त्याचे व्हीडीओ चित्रीकरण (Video shooting) करून हा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.(Pune Crime)

या प्रकरणी पर्वती पोलिसांनी सुशांत अशोक गायकवाड (Sushant Ashok Gaikwad) (रा. दांडेकर पूल)  याच्या विरोधात बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी १७  वर्षांची आहे. आरोपी सुशांत याने तिच्यासोबत प्रेमाचे नाटक केले. तिला गोड बोलून खडकवासला येथे  फिरायला घेऊन गेला. ती अल्पवयीन असल्याचे माहीत असतानादेखील तिला लग्नाचे आमिष  दाखवले. तिला लॉजवर नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. शारीरिक संबंध प्रस्थापित करीत असताना त्याचे व्हीडीओ चित्रीकरण करून हा व्हीडीओ व्हाॅट्सॲपवर व्हायरल केला असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest