संग्रहित छायाचित्र
पिंपरी चिंचवडमधील चाकण जवळील रासे गावामध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. टॉयलेटमध्ये गेलेल्या तरुणीचे दार तोडून चुलत्यानेच व्हिडिओ शूटिंग काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तरुणीच्या आईचा विनयभंग करण्यात आला आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि. २) सकाळी १० च्या सुमारास घडला. या प्रकरणी नराधम चुलत्याला चाकण पोलीसांनी अटक केली आहे.
सयाजी राघु मुंगसे (वय ५५, रा. रासे ता. खेड जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या चुलत्याचे नाव आहे. तर ५० वर्षीय चुलतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी २१ वर्षीय पीडित तरुणीने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सयाजी आणि ५० वर्षीय महिला पीडित तरुणीचे चुलता चुलती आहेत. तरुणी शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास टॉयलेटमध्ये जात होती. यावेळी आरोपी सयाजीने तरुणीचे व्हिडीओ शुटींग काढुन टॉयलेटचा दरवाजा जोरात ढकलुन उघडुन विनयभंग केला.
या सगळ्या घटनेमुळे तरुणीच्या आईने जाब विचारला असतास आरोपीने आईच्या दंडाला पकडून तिचा हात पिरगाळला. तसेच तिला जोराची मिठी मारत साडीच्या पदराला पकडून स्वतःच्या घरामध्ये वरबाडत नेले. तर चुलतीने पीडित तरुणीच्या आईला मारहाण करून धमकी दिली. या प्रकरणी पीडित तरुणीने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, पोलीसांनी चुलता आणि चुलतीविरोधात कलम ३५४, ३२३, ५०४, ५०६ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करून चुलता सयाजी याला अटक केली आहे. या प्रकरणचा अधिक तपास चाकण पोलीस करत आहेत.