Crime : महिलेचा अंघोळीचा बनवला व्हिडीओ...ब्लॅकमेल करीत केला बलात्कार; लष्करी जवनाविरुद्ध गुन्हा दाखल

लष्करात असलेल्या जवळच्या नातेवाईकांनी एका महिलेचा लपून अंघोळ करीत असतानाचा व्हिडिओ चित्रित केला. त्या आधारे तिला ब्लॅकमेल (Blackmail)करीत बळजबरीने शरीर संबंध प्रस्थापित केले. तसेच तिची बदनामी करण्याची धमकी (threat)दिली.

संग्रहित छायाचित्र

पुणे : लष्करात असलेल्या जवळच्या नातेवाईकांनी एका महिलेचा लपून अंघोळ करीत असतानाचा व्हिडिओ चित्रित केला. त्या आधारे तिला ब्लॅकमेल (Blackmail)करीत बळजबरीने शरीर संबंध प्रस्थापित केले. तसेच तिची बदनामी करण्याची धमकी (threat)दिली.हा प्रकार २०१६ मध्ये पासून नोव्हेंबर २०२३ पर्यंत वडगाव बुद्रुक आणि नऱ्हे येथे घडला. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी (Sinhagad Road Police)आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

बळीराम माधव गुट्टे (Baliram Madhav Gutte)  (वय ३५, रा. १०२, इंजिनियर रेजिमेंट, भोपाळ) असे गुन्हा दाखल झालेल्या चे नाव आहे. याप्रकरणी ३५ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. गुट्टे आणि पीडित महिला एकमेकांचे नातेवाईक आहेत. त्याने या महिलेचे नकळत आंघोळ करतानाचे व्हिडिओ चित्रित केले. हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यांच्याशी जबरदस्तीने वारंवार शरीर संबंध प्रस्थापित केले. त्यांच्या घरी येऊन तसेच वेगवेगळ्या ठिकाणी बोलावून जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या संदर्भात कोणाला काही सांगितल्यास घरच्यांना आणि गावातील लोकांना सगळे सांगून व्हिडिओ व्हायरल करीन आणि बदनामी करीन अशी धमकी दिली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest