Crime : ग्रामीण भागात देखील बांग्लादेशींचा कबिला

दहशतवाद विरोधी पथक, (Anti Terrorism Squad) पुणे युनिट व नारायणगाव पोलिसांनी नारायणगाव येथे संयुक्त कारवाई करीत ०८ बांग्लादेशी नागरीकांविरूध्द कारवाई केली. पुणे शहरापाठोपाठ आता ग्रामीण भागात देखील बांग्लादेशींचे कबिले (Tribes of Bangladeshi) तयार होताना दिसत आहेत.

Tribes of Bangladeshi

संग्रहित छायाचित्र

पुणे : दहशतवाद विरोधी पथक, (Anti Terrorism Squad) पुणे युनिट व नारायणगाव पोलिसांनी (Narayangaon Police) नारायणगाव येथे संयुक्त कारवाई करीत ०८ बांग्लादेशी नागरीकांविरूध्द कारवाई केली. पुणे शहरापाठोपाठ आता ग्रामीण भागात देखील बांग्लादेशींचे कबिले (Tribes of Bangladeshi) तयार होताना दिसत आहेत. (Crime News) 

दहशतवाद विरोधी पथक, पुणे युनिटला याबाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार, गुरुवारी  नारायणगाव येथे छापे टाकण्यात आले. मेहबुल नजरून शेख, राणा जमातअली मंडल, गफुर राजेवली शेख, आलमगीर जमातअली मंडल, शालोम मुस्तफीजुर मंडल, अफजल हमिबुल खान, कबीर मुज्जाम मुल्ला, जमातअली व्हायतअली मंडल (फरार) (सर्व सध्या रा. नारायणगाव मुळ बांग्लादेश) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

हे सर्व ८ बांग्लादेशी नागरीक कोणत्याही वैध प्रवासी कागदपत्रांशिवाय तसेच भारत बांग्लादेश सिमेवरील मुलकी आधिका-यांच्या लेखी परररवानगी शिवाय घुसखोरीच्या मार्गाने भारतात आले. भारतात अवैधरित्या वास्तव्य करताना आढळून आले. त्यांच्या विरूध्द परकीय नागरीक कायदा १९४६ कलम १४, पारपत्र अधिनियम १९६७ - नियम ३, ६, पारपत्र (भारतात प्रवेश) परकीय नागरीक आदेश १९५० चे कलम ३ (अ) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest