Sextortion : ज्येष्ठ नागरिकाला 'सेक्सटोर्शन' करीत लुबाडले

ज्येष्ठ नागरिकाशी ऑनलाईन संपर्क साधत त्याचे अश्लील व्हिडिओ (Sextortion )सोशल मीडियावर व्हायरल करण्याची नेमकी देत तीन लाख ७४ हजार २३२ रुपये उकळण्यात आले. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी (Lonikand Police) अज्ञात मोबाईल धारक आणि राहुल शर्मा (Rahul Sharma) नावाच्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

sextortion

ज्येष्ठ नागरिकाला 'सेक्सटोर्शन' करीत लुबाडले

पुणे : ज्येष्ठ नागरिकाशी ऑनलाईन संपर्क साधत त्याचे अश्लील व्हिडिओ (Sextortion )सोशल मीडियावर व्हायरल करण्याची नेमकी देत तीन लाख ७४ हजार २३२ रुपये उकळण्यात आले. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी (Lonikand Police) अज्ञात मोबाईल धारक आणि राहुल शर्मा (Rahul Sharma) नावाच्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 याप्रकरणी ६५ वर्षीय जेष्ठ नागरिकाने फिर्याद दिली आहे. फिर्यादी वाघोली येथील साई सत्यम पार्क सोसायटीजवळ राहण्यास आहेत. हा सर्व प्रकार ११ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०२३ या कालावधी दरम्यान घडला. आरोपी मोबाईल धारकाने या जेष्ठ नागरिकाशी ऑनलाईन संपर्क साधला. त्यांना अश्लील व्हिडिओ कॉल करायला प्रवृत्त करीत भुरळ घातली. त्यांचे व्हिडिओ रेकॉर्ड करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. हे व्हिडिओ डिलीट करण्यासाठी त्यांच्याकडून लाखो रुपये उकळण्यात आले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest