Pune Crime : गणेशोत्वासाठी गावी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपीसोबत झाली होती इन्स्टाग्रामवर ओळख

गणेशोत्सवासाठी सांगली येथे मामाच्या घरी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायद्यान्वये एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Tue, 10 Oct 2023
  • 03:20 pm
Pune Crime

गणेशोत्वासाठी गावी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पुणे : गणेशोत्सवासाठी सांगली येथे मामाच्या घरी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायद्यान्वये एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या तरुणाची या अल्पवयीन मुली सोबत इंस्टाग्रामवरून ओळख झालेली होती.

अनिकेत सुरेश माने (वय २०, रा. बत्तीस शिराळा, ता. शिराळा, जि. सांगली) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या ३४ वर्षीय आईने फिर्याद दिली आहे. हा सर्व प्रकार सांगली जिल्ह्यातील विटा या ठिकाणी घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी सोळा वर्षांची आहे. ती पुण्यातील एका महाविद्यालयामध्ये इयत्ता बारावी मध्ये शिकते. ती गणेश उत्सवाकरिता तिच्या मामाकडे सांगली जिल्ह्यात गेली होती. दरम्यान, आरोपी अनिकेत माने याच्यासोबत तिची इंस्टाग्राम वरून ओळख झालेली होती. आरोपी अनिकेत याने या तरुणीला भेटायला बोलावले. ती घरापासून जवळच असलेल्या म्हशीच्या गोठ्याजवळ त्याला भेटायला गेली. आरोपी अनिकेत याने 'माझ्याकडे तुझे व्हिडिओ आहेत. ते मी व्हायरल करून बदनामी करीन' अशी तिला धमकी दिली. त्यानंतर तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. विरोध करताच तिला हाताने मारहाण करून जबरदस्तीने मोटरसायकलवर बसवले आणि घरापासून लांब असलेल्या विटा-तासगाव रस्त्यावरील बस थांब्याजवळ असलेल्या ज्वारीच्या शेतामध्ये नेले. त्या ठिकाणी पुन्हा तिच्यासोबत दोन वेळा शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यात आले.

या पीडित तरुणीला तिथेच सोडून हा आरोपी तेथून पसार झाला. त्यानंतर ही तरुणी कशीबशी आपल्या मामाच्या घरी पोचली. तिने घडलेला सर्व प्रकार मामाला सांगितला. त्यानंतर हे कुटुंब पुण्याला आले. या संदर्भात आई-वडिलांना माहिती दिल्यानंतर त्यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक भारत चंदनशिव करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest