Pune Crime : अल्पवयीन मुलीवर बलात्कार... गरोदर राहिल्याने झाली प्रसूती

अल्पवयीन मुलीशी प्रेमाचे नाटक करीत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याने ही मुलगी गरोदर राहिली. तिचे दिवस भरल्यानंतर रुग्णालयात प्रसूती करण्यात आली. तिने मृत बाळाला जन्म दिल्याचे प्रकरण समोर आले आहे.

Pune Crime

अल्पवयीन मुलीवर बलात्कार... गरोदर राहिल्याने झाली प्रसूती

पुणे: अल्पवयीन मुलीशी प्रेमाचे नाटक करीत तिच्याशी शारीरिक संबंध  ठेवल्याने ही मुलगी गरोदर राहिली. तिचे दिवस भरल्यानंतर रुग्णालयात प्रसूती करण्यात आली. तिने मृत बाळाला जन्म दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसानी (Bharti vidyapith Police) तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार गायमुखवाडी येथील स्मशानभूमी जवळ घडला. (Pune Crime)

विनोद धर्तीमगर (Vinod Dhartimar) (रा. शिवाजी चौक, आंबेगाव) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी १८ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. पीडित मुलगी आणि आरोपी विनोद एकमेकांच्या ओळखीचे आहेत. फिर्यादी मुलगी अल्पवयीन असताना त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला गायमुख स्मशानभूमी येथील झाडेझुडपामध्ये नेऊन तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. हा प्रकार १७ नोव्हेंबर २०१९ ते १७ नोव्हेंबर २०२३ या कालावधी दरम्यान घडला. त्यामुळे ही तरुणी गर्भवती राहिली. पोटात दुखत असल्याने तिला दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी तिच्यासोबत तिची बहीण आणि मामा होते. खेड शिवापूर येथील रुग्णालयामध्ये तिची प्रसूती झाली. तिला झालेली मुलगी मृत जन्माला आली. यानंतर रुग्णालयाकडून राजगड पोलीस ठाण्यात याबाबत माहिती देण्यात आली. राजगड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तो पुणे पोलिसांकडे वर्ग केला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest