संग्रहित छायाचित्र
पुणे शहरात सध्या गणपती उत्सवाची जय्यत तयारी सुरु आहे. अशातच शहरातील हडपसर भागातून गणेश मुर्तीच्या किमतीवरून किरकोळ वाद झाल्याची घटना समोर आली आहे. हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत साने गुरुजी शाळेच्या समोर हा प्रकर घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत साने गुरुजी शाळेच्या समोर तुळशीराम देवराम राठोड (रा - साने गुरुजी शाळेसमोर, हडपसर) व मजाराम ठोकामजी तावरी (रा - साने गुरुजी शाळेसमोर, हडपसर) यांचे गणेश मूर्ती विक्रीचे स्टॉल आहे. त्यांच्या स्टॉलवर रविवारी रात्री १० च्या सुमारास रोहन शिवराम गुजर, विष्णू तिरुपती बिरसा व प्रसाद नारायण पाता सर्व राहणार (भैरवनाला, फातिमानगर) हे गणेस मूर्ती खरेदी करण्यासाठी आले. त्यावेळी मूर्ती खरेदी करण्यावरून यांच्यामध्ये किरकोळ वाद झाला.
सदर घटनेची हडपसर पोलीस चौकीला माहिती मिळताच पोलीसांनी घटनेची माहिती घेतली आणि सर्वांना समज दिला. दरम्यान घटनास्थळावर शांतता असून कायदा व व्यवस्थेचा कोणताही प्रश्न नसल्याचे पोलीसांनी सांगितले. हडपसर पोलीस पुढील तपास करत आहेत.