Crime : प्रेयसीच्या 'सेकंड अफेअर'मुळे अल्पवयीन मुलाने उचलले टोकाचे पाऊल...

आपली प्रेयसी दुसऱ्या मुलाबरोबर फिरत असल्याच्या नैराश्यातून सोळा वर्षे अल्पवयीन मुलाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना येरवडा येथील लक्ष्मी नगर मध्ये घडली. याप्रकरणी येरवडा पोलीस (Yerwada Police) ठाण्यात त्याच्या प्रेयसी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

suicide

संग्रहित छायाचित्र

पुणे : आपली प्रेयसी दुसऱ्या मुलाबरोबर फिरत असल्याच्या नैराश्यातून सोळा वर्षे अल्पवयीन मुलाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना येरवडा येथील लक्ष्मी नगर मध्ये घडली. याप्रकरणी येरवडा पोलीस (Yerwada Police) ठाण्यात त्याच्या प्रेयसी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

जीवन राजू कसबे (Jeevan Raju Kasabe) (वय १६) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी लक्ष्मीनगर येथे राहणाऱ्या सोळा वर्षीय अल्पवयीन मुली विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी जीवनची आई लक्ष्मी राजू कसबे (वय ३७) यांनी फिर्याद दिली आहे. जीवन आणि आरोपी मुलीमध्ये तीन वर्षांपासून प्रेम संबंध होते. मात्र, मागील काही दिवसांपासून या मुलीचे आणि जीवनचे बिनसले होते. ती त्याच्याशी नीट बोलत नव्हती. जीवन याला तिची इतर कोणत्यातरी मुलासोबत जवळीक वाढल्याचा संशय होता. त्यामधून त्याला मानसिक तणाव जाणवत होता. याच मानसिक त्रासातून त्याने त्याच्या आजीच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest