Pune Crime News : पेट्रोल पंपावर दरोड्याच्या तयारीतील टोळी गजाआड

पुणे-सासवड रस्त्यावर दरोडा (robbery) टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगाराच्या टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने जेरबंद केले आहे. ही कारवाई हडपसर येथील भोसले व्हीलेज सोसायटीच्या कमानीजवळ असलेल्या शिवगंगा बिल्डींग मटेरियल दुकानाच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेत करण्यात आली.

Pune Crime News

संग्रहित छायाचित्र

पुणे : पुणे-सासवड रस्त्यावर दरोडा (robbery) टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगाराच्या टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने जेरबंद केले आहे. ही कारवाई हडपसर येथील भोसले व्हीलेज सोसायटीच्या कमानीजवळ असलेल्या शिवगंगा बिल्डींग मटेरियल दुकानाच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेत करण्यात आली. हडपसर पोलीस (Hadpsar Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News) 

अमन संजय दिवेकर (वय २२), विशाल संजय लोखंडे (वय २४), पंकज दिवेकर आणि दोन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक पृथ्वीराज पांडुळे यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी पोलिसांच्या अभिलेखावरील गुन्हेगार आहेत. हे गुन्हेगार पुणे सासवड रस्त्यावर असलेल्या हिंदुस्थान पेट्रोलियमच्या विठ्ठल पेट्रोलपंपावर दरोडा टाकणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावत आरोपींना जेरबंद केले. त्यांच्याकडून दोन कोयते, लाल मिरची पावडर, नायलॉनची दोरी आदी घातक शस्त्रे मिळाली आहेत. पेट्रोल पंपावरची रोकड लुटण्याचा त्यांचा मनसुबा होता.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest