पुण्यातील मुळा-मुठा नदीत सापडला मृतदेह

पुण्यातील एस एम जोशी पुलाखालील मुळा मुठा नदीत एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Sun, 27 Aug 2023
  • 12:45 pm
Pune Crime : पुण्यातील मुळा-मुठा नदीत सापडला मृतदेह

मुळा-मुठा नदीत सापडला मृतदेह

पुण्यातील एस एम जोशी पुलाखालील मुळा मुठा नदीत एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला. प्रत्यक्षदर्शी तसेच पोलीसांच्या प्राथमिक माहितीवरून ही आत्महत्या असल्याचे सांगितले जात आहे. पोलीसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे. 

दरम्यान, शहरातील सेनादत्त पोलीस चौकीत दोन ते तीन दिवसांपूर्वी एक इसम हरवल्याची तक्रार दाखल आहे. शिवाय नागरिकांकडून हा तोच व्यक्ती असल्याचे सांगितल जात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी पुण्यातील एस एम जोशी पुलाखाली नदीत एक मृतदेह आल्याची माहिती डेक्कन पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दलाची मदतीने पोलीसांनी मृतदेह बाहेर काढला. पुढील तपास डेक्कन पोलीस करत आहेत. 

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest