संग्रहित छायाचित्र
पुणे : चिथावणीखोर भाषण, दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यात ४ सप्टेंबर रोजी पुण्येश्वर मंदिर परिसरातील अनधिकृत बांधकाम हटवावे यासाठी महापालिकेबाहेर आंदोलन करण्यात आले होता. या आंदोलनादरम्यान एकबोटे यांनी चिथावणीखोर भाषण केल्याची तक्रार दाखल झाली होती. आंदोलन होऊन 22 दिवसानंतर पोलिसांनी आयोजकांवर व मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल केला.
भाजप नेते नितेश राणे यांनी देखील यावेळी प्रक्षोभक भाषणे केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावरून नितेश राणे भाजप आमदार महेश लांडगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी सुद्दा मागणी झाली होती. महापालिका अधिकारी व शहरातील मुस्लिम संघटनांनी ही मागणी केली होती.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 सप्टेंबर रोजी पुण्यात महानगरपालिका मुख्यालयाबाहेर भाजपासह काही हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केले होते. मंदिराजवळील अनधिकृत बांधकाम हटवण्याची मागणी करण्यासाठी हे आंदोनक करण्यात आले होते. यासाठी आयोजकांकडून कोणतीही पूर्वपरवानगी घेण्यात आली नव्हती. तसेच आंदोलनादरम्यान एकबोटे आणि अन्य तीन कुणाल कांबळे, किरण शिंदे आणि विशाल पवार यांनी प्रक्षोभक भाषण केलं होतं. या भाषणामुळे दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता होती. त्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.