Bhagini Nivedita Bank : भगिनी निवेदिता बँकेला ५० लाखांचा गंडा

भगिनी निवेदिता बँकेकडे (Bhagini Nivedita Bank) सदनिका तारण ठेवून ५० लाख रुपयांचे कर्ज घेण्यात आले. त्यानंतर बनावट कागदपत्रांच्या आधारे ही सदनिका भलत्याच व्यक्तीला विकण्यात आली. त्याकरिता दुय्यम निबंध कार्यालयामध्ये बनावट कागदपत्रे सादर करण्यात आली.

Bhagini Nivedita Bank

संग्रहित छायाचित्र

पुणे : भगिनी निवेदिता बँकेकडे (Bhagini Nivedita Bank) सदनिका तारण ठेवून ५० लाख रुपयांचे कर्ज घेण्यात आले. त्यानंतर बनावट कागदपत्रांच्या आधारे ही सदनिका भलत्याच व्यक्तीला विकण्यात आली. त्याकरिता दुय्यम निबंध कार्यालयामध्ये बनावट कागदपत्रे सादर करण्यात आली. अशा प्रकारे बँकेची ५० लाख रुपयांची फसवणूक (Fraud) करण्यात आली. हा प्रकार २८ जुलै २०२२ ते ३१ ऑक्टोबर २०२२ या कालावधी दरम्यान प्रभात रस्त्यावरील बँकेच्या शाखेमध्ये घडला. या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी (Deccan Police) गुन्हा दाखल केला आहे. (Pune crime news)

गुरबिरसिंह धर्मवीरसिंग लांबा (Gurbir Singh Dharamvir Singh Lamba), त्याची पत्नी रमिता गुरबिरसिंह लांबा (Ramita Gurbir Singh Lamba), अमित रविकिरण गायकवाड (Amit Ravikiran Gaikwad)अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता किशोर देशपांडे (Smita Kishore Deshpande) (वय ५७, रा. सहवास सोसायटी, कर्वेनगर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरबिरसिंग आणि त्याची पत्नी रमिता यांनी त्यांच्या मालकीची सदनिका बँकेकडे तारण ठेवली. त्या पोटी ५० लाख रुपयांचे कर्ज घेतले. त्याची अधिकृतरित्या दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये नोंदणी करण्यात आली.

त्यानंतर संगणमत करून बनावट कागदपत्रे तयार केली. बँकेकडून घेतले ५० लाख रुपयांच्या कर्जाची बँकेस परतफेड केली नसतानाही कर्ज फेडल्याचे भासवले. दुय्यम निबंध कार्यालयाकडे बनावट 'रिलीज डिड' दस्त तयार करून सादर केला. यादस्ताच्या सहाय्याने तारण असलेली ही सदनिका अमित गायकवाड यांना विकण्यात आली. या विक्री व्यवहाराचाही दस्त तयार करण्यात आला. अशा प्रकारे बँकेचा विश्वासघात करून आर्थिक फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी डेक्कन पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest