Crime : नोकरीच्या आमिषाने २१ लाखांची फसवणूक

पुणे महानगरपालिकेमध्ये नोकरी लावण्याचा आमिषाने २१ लाख रुपये घेऊन आर्थिक फसवणूक (Fraud) करण्यात आली. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस (Vishrambag Police) ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १ जुलै २०१४ पासून १डिसेंबर 2023 दरम्यान घडला. (Pune Crime News)

Pune Crime News

संग्रहित छायाचित्र

पुणे : पुणे महानगरपालिकेमध्ये नोकरी लावण्याचा आमिषाने २१ लाख रुपये घेऊन आर्थिक फसवणूक (Fraud) करण्यात आली. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस (Vishrambag Police) ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १ जुलै २०१४ पासून १डिसेंबर 2023 दरम्यान घडला. (Pune Crime News)

राहुल सतीश कुलकर्णी (Satish Kulkarni  (रा. घर नंबर १८२, उल्हास सोसायटी, सहकार नगर नंबर २) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी चंद्रकांत गणपत पवार (रा. विठ्ठल रेसिडेन्सी, वडगाव बुद्रुक) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राहुल कुलकर्णी याने चंद्रकांत पवार यांचा भाऊ राहुल यांना पुणे महानगरपालिकेमध्ये नोकरी लावतो असे सांगितले. खोटे आश्वासन देऊन त्यांच्याकडून सात लाख ५० हजार रुपये चेक स्वरूपात आणि १३ लाख ५० हजार रुपये रोख स्वरूपात असे एकूण २१ लाख रुपये उकळले. 

पावर यांच्या भावाला महानगरपालिकेमध्ये नोकरी लावण्यात आली नाही. तसेच, या नोकरी बाबत वारंवार विचारणा केली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांच्याकडून घेतलेले पैसे परत केले नाहीत. कुलकर्णी यानए सिक्युरिटी म्हणून पवार यांच्याकडे धनादेश दिलेले होत. हे धनादेश देखील बँकेत भरू न देता फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest