Black Magic : पुण्यात हे काय! काळी जादू अन् पैशांचा पाऊस.... १८ लाख घेऊन चौघे पसार

पुण्यामध्ये काळी जादू करून, आघोरी कृत्य करीत पैशांचा पाऊस पडतो असे सांगत तरुणाला १८ लाख रुपयांना लुटण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना २ डिसेंबर रोजी रात्री पावणे बाराच्या सुमारास हडपसर येथील ससाने नगर मध्ये घडली.

Black Magic

Black Magic : पुण्यात हे काय! काळी जादू अन् पैशांचा पाऊस.... १८ लाख घेऊन चौघे पसार

पुणे : पुण्यामध्ये काळी जादू करून, आघोरी कृत्य करीत पैशांचा पाऊस पडतो असे सांगत तरुणाला १८ लाख रुपयांना लुटण्यात आल्याची घटना समोर आली आहे.  ही घटना २ डिसेंबर रोजी रात्री पावणे बाराच्या सुमारास हडपसर येथील ससाने नगर मध्ये घडली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadpsar Police) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

बाबा आयरा शाब (Baba Ayra Shaab)  (रा. बदलापूर, ठाणे), माधुरी मोरे, रॉकी वैद्य (रा. बदलापूर, ठाणे), किशोर पांडागळे (Kishore Pandagale) (रा. एनडीए रोड, उत्तम नगर, वारजे) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी विनोद छोटेलाल परदेशी (वय ४३, रा. रामनगर, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. विनोद परदेशी यांचा प्लास्टिक मोल्डिंग आणि कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. या सर्व आरोपींनी आपसात संगणमत करून  विशाल बिनावत यांच्या घरी फिर्यादीला बोलवले. त्या ठिकाणी परदेशी यांना आम्ही पैशांचा पाऊस पडतो असे खोटे सांगितले. त्यांना खूप पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवत त्यांच्याकडून १८ लाख रुपयांनी भरलेली पैशाची बॅग घेतली. त्यानंतर हे सर्व आरोपी पसार झाले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest