Pune Crime News : तोतया अ‍ॅक्सिस बँक अधिकारी असल्याचे भासवित १२ लाख ८० हजारांचा गंडा

मोबाईल क्रमांकावर मेसेज व फोनवर संपर्क साधता तोतया अ‍ॅक्सिस बँक अधिकाऱ्याने बँक खात्याची केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने आधार कार्ड, पॅन कार्ड, डेबिट कार्डची माहिती घेऊन त्यांच्या नावाने नवीन तीन बँक खाते उघडून १२ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली.

Pune Crime News

तोतया अ‍ॅक्सिस बँक अधिकारी असल्याचे भासवित १२ लाख ८० हजारांचा गंडा

पुणे : मोबाईल क्रमांकावर मेसेज व फोनवर संपर्क साधता तोतया अ‍ॅक्सिस बँक अधिकाऱ्याने बँक खात्याची केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने आधार कार्ड, पॅन कार्ड, डेबिट कार्डची माहिती घेऊन त्यांच्या नावाने नवीन तीन बँक खाते उघडून १२ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक (Fraud)करण्यात आली. हा प्रकार २० सप्टेंबर ते २१ सप्टेंबर २०२३ या कालावधीत कोथरूडमध्ये ऑनलाईन घडला. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी (Kothrud Police) दोन अज्ञात मोबाईल धारक आणि अनोळखी बँक खाते धारकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.  (Pune Crime News)

संजय राजाराम कुलकर्णी (Sanjay Kulkarni)  (वय ५४, रा. कृष्णा अपार्टमेंट, लोकमान्य कॉलनी, पौड रोड, कोथरूड) यांनी यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत वरिष्ठ निरीक्षक हेमंत पाटील म्हणाले, की आरोपींनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला. त्यातील एकाने तो अॅक्सिस बँकेचा अधिकारी असून बँक खात्याची केवायसी अपडेट करायची असल्याची बतावणी केली. कुलकर्णी यांना त्याने त्यांच्या आधार कार्ड, पॅन कार्ड, डेबिट कार्डची माहिती दिली. त्यामुळे कुलकर्णी यांचा त्यावर विश्वास बसला. याच वेळी त्यांना मोबाईलवर विविध ओटीपी प्राप्त झाले. आरोपींनी ही ओटीपी त्यांच्याकडून घेतले. 

त्यानंतर २१ सप्टेंबर २०२३ रोजी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर बरेच ओटीपी प्राप्त झाले. त्यामुळे कुलकर्णी यांना शंका आली. याबाबत त्यांनी अॅक्सिस बँकेच्या पौड रोड शाखेत जाऊन चौकशी केली. तेव्हा त्यांना त्यांच्या खात्यावरून १२ लाख ८० हजार रुपयांचे कर्ज काढण्यात आल्याचे समोर आले. या कर्जाकरिता प्रोसेसिंग फी, इन्शुरन्स चार्जेस, स्टॅम डयुटी फी इत्यादी खर्च वजा करून ११ लाख ८० हजार ०५९ रूपये  त्यांच्या खात्यात जमा झाल्याचे तसेच ही रक्कम अन्य बँक खात्यांमध्ये वर्ग झाल्याचे देखील निदर्शनास आले. आपली बँक खात्याची केवायसी अपडेट करण्याचा बहाना करून त्यांची आर्थिक फसवणुक झाल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी सायबर  पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दाखल केला होता. कर्जाची ११ लाख ८० हजार ०५९ रूपयांची रक्कम  अॅक्सिस बँकेच्या आठ विविध खात्यांवर वर्ग करून घेतली. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest