पुणे विद्यापीठाच्या मेसमधील जेवणात किडे, विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मेसच्या जेवणामध्ये किडे निघाले. काही दिवसांपासून विद्यापीठात अळी कीडे निघण्याचे प्रमाण वाढलेल आहे. मुलींच्या मेसमध्ये सुद्धा काही दिवसांपूर्वी किडे निघाले होते. त्यावर विद्यापीठ प्रशासनाने काहीच ॲक्शन घेतली नाही. एखाद्या विद्यार्थ्याचं काही बर वाईट झालं तर त्यास मेस चालक व विद्यापीठ प्रशासन जबाबदार असेल असा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने करण्यात आला आहे.
यावर लवकरच विद्यार्थी परिषद व्यापक आंदोलन उभे करणार असल्याचे सांगण्यात आले. या विद्यार्थांच्या आरोग्याशी होणारा खेळ विदयार्थी परीषद चालू देणार नाही. जेवणाचा दर्जा अत्यंत खालावलेला आहे. विद्यापीठाने यावर लवकरच भोजन समिती नेमावी. जेणेकरून मेसवर नियंत्रण राहील. मेस चालकांची मनमानी खपवून घेतली जाणार नाही. विद्यापीठ प्रशासनाने यावर लवकरात लवकर कारवाई करावी, असे परिषदेचे पुणे विद्यापीठ अध्यक्ष शिवा बारोळे म्हणाले.
दरम्यान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुलींच्या वसतीगृहामध्ये मुलींच्या जेवणासाठी स्वतंत्र मेसची सुविधी आहे. या मेसमध्ये साधारण सकाळी ६० ते ७० विद्यार्थीनी जेवणासाठी येतात तर संध्याकाळी १२५ ते १५० विद्यार्थीनी जेवणासाठी येत असतात. शिवाय सकाळच्या नास्ता याच मेसमध्ये दिला जातो. या अगोदर मुलींच्या मेसमध्ये देण्यात आलेल्या पोह्यांमध्ये एक झुरळ आढळून आले होते. ही बाब अतिशय गंभीर असून सातत्याने विद्यापीठांमधील मेस चालक विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळत आहेत. त्यामुळे, विद्यार्थ्यांच्या आरोग्याच प्रश्न उपस्थित झाला आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.