Sudhir Mungantiwar : आम्ही भावनेवर निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत नाही – सुधीर मुनगंटीवार

“महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या तर आम्ही आजही तयार आहोत. भाजप आणि एकनाथ शिदें यांची शिवसेना भावनेवर निवडणूक लढवत नाही. आम्ही विकासावर निवडणुका लढवतो”, अशा शब्दात मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Thu, 18 May 2023
  • 01:22 pm
आम्ही भावनेवर निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत नाही – सुधीर मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार यांचा उद्धव ठाकरे यांना टोला

 

महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या तर आम्ही आजही तयार आहोत. भाजप आणि एकनाथ शिदें यांची शिवसेना भावनेवर निवडणूक लढवत नाही. आम्ही विकासावर निवडणुका लढवतो, अशा शब्दात मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जी. पे. नड्डा पुणे दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर मुनगंटीवार आज पुण्यात आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांची आजही निवडणुकीला सामोरे जायला तयार आहोत. कारण आम्ही वर्षभर काम करतो. आम्ही भावनेवर निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करत नाहीत.

मुंबई असो नागपूर असो आम्ही सर्व ठिकाणी विकासाच्या माध्यमातून निवडणुकीसाठी जाणार आहोत. आणि त्यासाठी आजही निवडणुक झाली तर आम्ही लढायला तयार आहोत. आम्हाला वाट पाहण्याची गजर नाही. केवळ सुप्रिम कोर्टाने या संदर्भात निर्देश देण्याची आवश्यकता आहे”, असेही मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest