संग्रहित छायाचित्र
प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने पुणे-दानापूर विशेष दैनंदिन गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या रेल्वेचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
गाडी क्रमांक ०१४८१ पुणे-दानापूर स्पेशल दिनांक १४ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर २०२४ पर्यंत (३० फेऱ्या) पुण्याहून १९.५५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी दानापूरला ०४.३० वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक ०१४८२ दानापूर-पुणे स्पेशल, दिनांक २६ नोव्हेंबर ते २५ डिसेंबर २०२४ (३० फेऱ्या) दानापूरहून ६.३० वाजता सुटेल आणि पुण्याला दुसऱ्या दिवशी १७.३५ वाजता पोहोचेल.
थांबे:
दौंड कॉर्ड लाइन , अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा.
रेल्वे गाडीची रचना:
एकूण १८ आयसीएफ कोच यामध्ये दोन एसी थ्री टियर, आठ स्लीपर क्लास, दोन लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅनसह, आठ सामान्य द्वितीय श्रेणी डब्बे असतील.
प्रवासासाठी आरक्षण कुठे करावे ?
ट्रेन क्रमांक ०१४८१ साठी बुकिंग २३ नोव्हेंबर रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रे आणि www.irctc.co.in वेबसाइटवर सुरू होणार आहे.
विशेष गाड्यांच्या सविस्तर थांब्याच्या वेळेसाठी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट देवू शकतो किंवा NTES ॲप डाउनलोड करून तिथून प्रवासी माहिती मिळवू शकतात.