भीमा नदीत पोहोण्यासाठी गेलेल्या तीन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू
पुणे : भीमा नदीत( Bhima River) पात्रात पोहण्यासाठी गेलेले तीन अल्पवयीन मुलं नदी पात्रात बुडाल्याची घटना घडली आहे. दौंड तालुक्यातील हातवळण येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
विशाल दिलेराम सिंग ( वय १६), निखिल नरेशसिंग कुमार (वय १५) व अमित रामेश्वर राम (वय १६) मुळ रा. आदवपुर जि. बिजनौर )अशी या मुलांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हातवळण परिसरातील भीमा नदी पात्रात सहा मुले पोहायला गेली होती. दरम्यान नदीत पोहत असताना मुलांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यामधील तीन मुलं नदीत बुडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिक आणि मच्छिमारांच्या मदतीनं पाण्यामध्ये बुडालेल्या दोन्ही मुलांचा शोध घेत तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. मृत मुले हे परराज्यातील असून ते हातवळण परिसरात असलेल्या उसाच्या गुऱ्हाळावर कामासाठी आले होते.
वसंत विठठल फडके यांच्या गुऱ्हाळावर काम करणाऱ्या मजूर दिलेराम भस्सु सिंग (वय ४५) यांचा मुलगा विशाल, भाचा निखिल, मेव्हणीचा मुलगा अमित, देव, निपिलकुमार व निरजकुमार असे सहा जण शनिवारी (दि ७) दुपारी हातवळण येथील भीमा नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेले होते. मात्र यामधील तीघे जण नदीच्या पात्रात वाहून गेले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.