तीन हजार किलो गोमांस घेऊन जाणारे दोघे अटकेत
#चाकण
गाय, बैलांची कत्तल करून तीन हजार किलो गोमांस घेऊन जाणाऱ्या पाच जणांवर चाकण पोलिसांनी कारवाई केली आहे. शिक्रापूर-चाकण रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली.
मोहिद रियाजत खान (वय ४०, रा. घाटकोपर, मुंबई), पिकअपचालक अमीर अहमद रशिद अहमद शेख (४४, रा. कल्याण) या दोघांना अटक करण्यात आली आहे, तर पिकअप मालक याकूब अहमद शेख (रा. ठाणे), इरफान शेख आणि रफीकभाई इद्रेसी (रा. जामखेड, अहमदनगर) यांच्या विरोधात पशुसंवर्धन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक इकबाल शेख यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
गोवंश कापणे, त्याची बेकायदा वाहतूक करणे, विक्री व खरेदी करण्याकरिता बंदी आहे. आरोपींनी गाय, बैलांना बेकायदा कापले. त्यांचे मांस धड, पाय, मुंडकी, कातडी असे तीन हजार किलो वजनाचे गोमांस घेऊन चालले होते, असे पोलिसांनी सांगितले.