बारामतीत शिकाऊ विमान कोसळले, पायलट जखमी
बारामती तालुक्यातील कटफल येथे शिकाऊ विमान कोसळल्याची घटना घडली आहे. बारामतीतील रेडबर्ड कंपनीचे शिकाऊ विमान लँडिंग करताना कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. यामध्ये पायलटला किरकोळ दुखापत झाली. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.
बारामतीत गेल्या काही वर्षांपासून विमान प्रशिक्षण संस्था त्यांचे प्रशिक्षण कार्यालय चालवत आहेत. बारामती विमानतळाच त्यासाठी वापर होतो. अनेक पायलट इथे विमान उडवण्याचं प्रशिक्षण घेऊन तयार होतात. आजही असंच ट्रेनिंग सुरु होतं. या ट्रेनिंगदरम्यान कटफलमध्ये विमान कोसळलं. दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात शिकाऊ पायलट शक्ती सिंग जखमी झाले आहेत. सुदैवाने ही दुखापत गंभीर नसल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
अपघात झाल्यावर विमानाचे अवशेष झाकून ठेवण्यात आले. विमान कोसळल्याच्या ठिकाणी बघ्यांची गर्दी झाली होती. वैमानिक प्रशिक्षक शक्ती सिंग जखमी झाले असून त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र, हा अपघात नेमका कशामुळे घडला, प्रशिक्षणार्थी पायलटकडून काही चूक झाली का, याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. त्याबाबतची चौकशी लवकरच होईल. मात्र सुदैवाने यामध्ये कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.