आनिला आणि किट्टूचे पिल्लू पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी, केरळमधून आणलेली गव्याची जोडी

पुण्यातील कात्रज येथील स्व. राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात मागील वर्षी आणलेल्या "आणिला आणि किट्टू" जोडीने एका पिल्लाला जन्म दिला आहे. हे पिल्लू सध्या पर्यटकांच्या पाहण्याचा आणि कुतूहलाचा विषय झालेला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Fri, 25 Aug 2023
  • 04:55 pm

आनिला आणि किट्टूचे पिल्लू पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी, केरळमधून आणलेली गव्याची जोडी

बजरंग निंबाळकर

पुण्यातील कात्रज येथील स्व. राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात मागील वर्षी आणलेल्या "आणिला आणि किट्टू" जोडीने एका पिल्लाला जन्म दिला आहे. हे पिल्लू सध्या पर्यटकांच्या पाहण्याचा आणि कुतूहलाचा विषय झालेला आहे.

मागील वर्षी केरळ इथून राजीव गांधी प्राणीसंग्रहालयामध्ये जुलै 2022 "आणिला आणि किट्टू" ही जोडी आणण्यात आली होती. या जोडीने एका नवीन पिल्लाला जन्म दिला आहे. हे पिल्लू सुदृढ अवस्थेत आहे. या गव्याच्या पिल्लाला पाहण्यासाठी पर्यटकांमध्ये उत्सुकताच असते व अशाप्रकारे गव्याने पिल्लू देण्याचा बारा वर्षानंतर ही पहिलीच वेळ आहे.

एकूण 130 एकर मध्ये विस्तारलेल्या राजीव गांधी प्राणी संग्रहालय मध्ये साठ प्रजातीचे एकूण 430 प्राणी आहेत .यामध्ये पाच वाघ, दोन हत्ती, दोन सिंह, तीन बिबटे, दोन गवे (व एक बाळ) त्याचबरोबर मोठ्या संख्येने काळवीट, हरीण, विविध जातींचे साप व इतर प्राणी या ठिकाणी पाहायला मिळत असतात. दिवाळीची तसेच उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये प्रेक्षकांमध्ये काय नवीन हे पाहण्यासाठी उत्सुकता लागलेली असते त्याची पूर्तता देखील प्राणीसंग्रहालयाकडून वारंवार केली जात असते.

अद्यापपर्यंत शेखरू, वाघाटी, रानमांजर लांडगा इत्यादी नवनवीन प्राणी बाहेरील प्राणी संग्रालयातून घेवाण देवानीच्या माध्यमातून आणण्यात आले आहेत. यामुळे राज्यभरासह देशातील व देशाबाहेरील देखील पर्यटक या ठिकाणी आवर्जून भेट देत असतात व मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.

कोरोना नंतरच्या खूप मोठ्या सुट्टीनंतर मागील वर्षी प्राणी संग्रहालय पर्यटकांसाठी खुले झाले. एक एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 यादरम्यान  22,05,664 पर्यटकांनी भेट दिली यामधून पर्यटकांचे तिकीट व इलेक्ट्रिक व्हेईकल याच्या माध्यमातून प्राणीसंग्रहालयाला 7 कोटी 84 लाख रुपये इतका निधी मिळाला आहे.

पुढील टप्प्यामध्ये पर्यटकांना प्राणी संग्रहालयाची ऑनलाइन तिकीट बुकिंग सुरू होनार असून, मुख्य प्रवेशद्वारावर एंट्रन्स प्लाझा देखील उभारण्यात येणार आहे, यामुळे पर्यटकांना तिकिटासाठी रांगा लावण्याची गरज पडणार तसेच मुख्य प्रवेशद्वार देखील सुशोभित दिसण्यास मदत होणार आहे. या प्राणी संग्रहालयची भुरळ भारतीय पर्यटका सोबतच विदेशी पर्यटकांना देखील असून 1578 विदेशी पर्यटकांनी देखील भेट दिली आहे. असून त्यांना देखील याची उत्सुकता आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest