नीरज शर्मा, उपाध्यक्ष, लेक्सिकॉन ग्रुप
मला माहीत आहे की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. परंतु मानवी उत्कृष्टतेचा सर्वोच्च प्रकार म्हणजे स्वतःला आणि इतरांना प्रश्न करत राहणे. माझ्या मते, सॉक्रेटिसच्या तत्त्वज्ञानाचा हा भाग कोणत्याही समाजात बदल घडवून आणण्यासाठी अत्यंत मूलभूत असा आहे. जे काही सध्या सुरू आहे त्याच्याशी जुळवून घेणे आणि अनेकदा आत्मसंतुष्ट होणे, हे आपल्या मानवी स्वभावात आहे. तथापि, ही आत्मसंतुष्टता दुर्दैवाने आपल्याला एका साचलेपणाकडे नेत आहे.
'एज्युकेशन कॉन्क्लेव्ह' हा आमच्या कार्यसंघाचा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे. जो आमच्या विद्यमान पद्धतींवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो आणि सक्षम संवादाद्वारे आम्हाला शिक्षक आणि नेत्यांचा एक संघ म्हणून चांगले कसे बनावे आणि चांगले कसे करावे याबद्दल विचार करण्यास प्रवृत्त करतो.
गेल्या दोन दशकांमध्ये मी एक शिक्षक म्हणून जे काही शिकलो, त्या प्रत्येक गोष्टीच्या आधारे, मला विश्वास आहे की आमच्या उद्योगात एक मोठा बदल होण्याची वेळ आली आहे. आपल्या अध्यापनशास्त्रीय पद्धतींचा पुनर्विचार करण्याची, पुनर्रचना करण्याची आणि शिक्षणात नवनिर्मितीची नवीन लाट आणण्याची वेळ आली आहे.
नवीन शैक्षणिक धोरण ही एक चौकट आहे, ज्यावर आम्ही एकत्रितपणे काम करू शकतो आणि आमच्या शहर, राज्य आणि देशातील प्रत्येक मुलांना शिक्षणाचे अनोखे मार्ग प्रदान करू शकतो. आमच्या संपूर्ण प्रणालीला यशस्वी अध्यापन आणि शिक्षणासाठी अनुकूल बनवण्याची ही एक अविश्वसनीय संधी आहे.
आपल्या विद्यमान त्रुटी, समस्या आणि चिंता दूर करण्यासाठी आपण एकत्र आले पाहिजे. आमच्या उद्योगातील सर्वोत्कृष्ट विचारांशी हा विधायक संवाद प्रभावी उपाय, सर्जनशील कल्पना प्रदान करतो. 'एज्युकेशन कॉन्क्लेव्ह'साठी हे आमचे ध्येय आहे!
आपल्या राज्यातील तरुणवर्ग नवनवीन अनुभव आणि संधींसाठी प्रयत्न करत आहे. आपण या तरुण मनांना त्यांच्यातील खरी क्षमता साध्य करण्यासाठी आत्मविश्वास, ज्ञान आणि कौशल्ये याद्वारे सुसज्ज करण्यात यशस्वी झालो तर आपण महाराष्ट्राचे भविष्य खऱ्या अर्थाने बदलू शकतो. एकही मूल मागे राहणार नाही, यासाठी जे काही शक्य आहे, ते सर्व करण्यावर आमचा भर असेल. त्यादृष्टीने या 'एज्युकेशन कॉन्क्लेव्ह'मध्ये आपल्या राज्यातील प्रत्येक शाळेत लागू करता येईल, अशा प्रणाली, कल्पना आणि धोरणे तयार करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.