यंदा गणेशमुर्ती २५ ते ३० टक्क्यांनी महागणार, पुण्यातील मुर्तीकारांचे संकेत
पुणे शहराला गणेशोत्सवाची वैभवशाली परंपरा आहे. शहरात सार्वजनिक व घरगुती, अशा दोन्ही प्रकारांत भव्य प्रमाणात गणेशोत्सव साजरा होतो. अशातच यंदाचा गणेशोत्सव अवघ्या एक महिन्यावर ऐऊन ठेपला आहे. त्यामुळे, लाडक्या बाप्पांच्या मुर्तिकारांची लगबग वाढली. मात्र, यंदा मंगलमुर्तींच्या किमती किमान २५ ते ३० टक्क्यांनी वाढतील असे संकेत पुण्यातील गणेश मुर्तीकारांनी दिले आहेत.
यंदा अधिक महिना असल्याने गणेशोत्सव महिनाभर लांबला. मात्र, गणरायाच्या स्वागताची तयारी सुरू झाल्याचे चित्र आहे. मुर्तीकार देखील गेल्या चार ते पाच महिन्यांपासून मुर्ती घडवायला लागले आहेत. शाडूच्या मूर्ती बनविणाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे. शिवाय, शाडूची मूर्ती वजनाने तीनपट जड व किमतीला न परवडणारी असते.
त्यातच मुर्तीकारांना देखील प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्तीऐवजी शाडूच्या मुर्ती बनवण्यास प्राधान्य दिले आहे. मात्र, गणेश भक्तांना प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्तीकडे जास्त आकर्षण असते. अशातच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्तींची मागणी वाढल्यास मुर्ती कमी पडू शकतात. त्यामुळे भाववाढ होण्याची शक्यता दाट आहे.
याविषयी मीररशी बोलताना मुर्तीकार गणेश लांजेकर म्हणाले की, “गेल्या ३५ ते ४० वर्षापासून मी मुर्ती घडवितो. यंदा आम्ही पुर्णपणे शाडूचे पर्यावरणपुरक गणेश मुर्ती बनवल्या आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्ती यंदा बनवल्या नाहीत. आम्ही गणेशमुर्ती घडवण्यासाठी चार ते पाच महिने राबत असतो. गणेशमुर्ती पाच मिनिटांत बननारी गोष्ट नाही. मशिनमध्ये टाकली अन् प्रोडक्ट तयार, असे नाही. मात्र, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्तींचे आकपर्षण जास्त असल्याने नागरिकांची मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुर्ती कमी पडल्यास भाववाढ होण्याची शक्यता जास्त आहे. नागरिकांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्तींऐवजी शाडूच्या मुर्तींकडे वळावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.”
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.