संग्रहित छायाचित्र
गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यातील दगडूशेठ गणपती बाप्पा विसर्जन मिरवणूक परंपरेप्रमाणे रात्री लक्ष्मी रस्त्यावर सहभागी होते. परंतु दरवर्षी निघायला होणारा उशीर खूपच वाढत चालला आहे. त्यामुळे, यंदा दुपारी ४ च्या दरम्यान श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मी रस्त्याने सहभागी होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरवर्षी परंपरेप्रमाणे गेल्या वर्षी देखील दगडूशेठ गणपती बाप्पा विसर्जन मिरवणूक रात्री लक्ष्मी रस्त्यावर सहभागी झाले होते. त्यामुळे, सकाळी ७.४५ वाजता बेलबाग चौकात बाप्पांचे आगमन झाले होते. भाविकांना बाप्पांच्या दर्शनासाठी खूप ताटकळत रहावे लागले. म्हणून भाविकांच्या भावनांचा विचार करून तसेच ज्या वेळेत गणेश मंडळे मिरवणुकीत सहभागी व्हायला फारशी उत्सुक नसतात, अशावेळी दुपारी ४ च्या दरम्यान श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मी रस्त्याने सहभागी होणार आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.