रेस्क्यू केलेल्या तस्कर जातीच्या सापाच्या अंड्यांमधून दीड महिन्यांनी आली पिल्ले जन्माला

वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सभासद भास्कर माळी यांना तळेगांव दाभाडे येथून कॉल आला. एक साप व त्याची अंडी असल्याची माहिती त्यांना देण्यात आली.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सभासद भास्कर माळी यांना तळेगांव दाभाडे येथून कॉल आला.  एक साप व त्याची अंडी असल्याची माहिती त्यांना देण्यात आली.  भास्कर माळी यांनी तातडीने त्या जागी पोहचून पाहिले की एक तस्कर (कॉमन त्रिंकेत) जातीचा साप होता.  सापाच सुखरूप रेस्क्यू  केलं व ५ अंडी त्यांनी मिळाली. सापाला लगेच त्याच्या अधिवासात मुक्त केले आणि ती अंडी सुरक्षितपणे संस्थेचे सभासद निनाद काकडे यांना दिली. त्यांनी त्या अंड्यांना ऊब साठी ठेवले.

दीड महिन्यानंतर सापाची पिल्ले अंड्यातून बाहेर आली. याची माहिती वनविभाग वडगाव वनरक्षक योगेश कोकाटे यांना दिली आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सभासद रोहित पवार आणि जिगर सोलंकी यांनी पिल्ले एकदम स्वस्थ आहे याची पाहणी करून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. संस्थेचे सभासद निनाद काकडे यांच्या परिश्रमामुळे आज त्या सापांना जीवदान मिळाले.

तस्कर हा एकदम बिनविषारी जातीचा साप आहे. हा साप लोक वस्तीत जास्त प्रमाणात आढळून येतो. हा साप उंदीर, बेडूक व इतर छोटे प्राणी खातो. या सापाचा कोणाला दंश झाला तरी काहीही होत नाही. हे साप आपल्या घराच्या आवारात त्यांचे भक्ष्य खाण्यासाठी येतात. तरी आपण बाहेर फिरताना काळजी घेणे आणि आपले परिसर स्वच्छ ठेवणे आणि कोणताही साप न मारणे याची काळजी घ्यावी असं वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे वन्यजीव अभ्यासक जिगर सोलंकी यांनी सांगितलं. 

कोणता ही वन्यप्राणी जखमी अवस्थेत आढळून आल्यास जवळपास च्या प्राणी मित्राला किंवा वनविभागला संपर्क (१९२६) करावा असे आवाहन वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे आणि अध्यक्ष अनिल आंद्रे यांनी लोकांना केले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest