Leopard Attack : बाळासाठी तिने केले बिबट्याशी दोन हात; पोटच्या गोळ्याला बिबट्याच्या जबड्यातून सोडवणाऱ्या आईने सांगितला हल्ल्याचा थरार

प्रत्येक आई पोटच्या मुलांसाठी वाटेल तो धोका पत्करायला तयार असते. अशीच एक आई थेट बिबट्याशी भिडल्याचे पुण्यातील आंबेगाव गावात पाहायला मिळाले. बिबट्याच्या जबड्यात असणाऱ्या पोटच्या गोळ्याला वाचवण्यासाठी तिने अक्षरशः स्वतःच्या जिवाचीही पर्वा केली नाही.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Fri, 13 Oct 2023
  • 01:30 pm
Leopard Attack

बाळासाठी तिने केले बिबट्याशी दोन हात

प्रत्येक आई पोटच्या मुलांसाठी वाटेल तो धोका पत्करायला तयार असते. अशीच एक आई थेट बिबट्याशी (Leopard) भिडल्याचे पुण्यातील आंबेगाव (Ambegaon) गावात पाहायला मिळाले.  बिबट्याच्या जबड्यात असणाऱ्या पोटच्या गोळ्याला वाचवण्यासाठी तिने अक्षरशः स्वतःच्या जिवाचीही पर्वा केली नाही. सोनाली करगळ (Sonali Kargal) असे या हिरकणीचे नाव आहे. आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे गावात सोमवारी (दि. ९) हे मेंढपाळ कुटुंबीय शेतात झोपले होते, तेव्हा मध्यरात्री दोन वाजता हा थरार घडला.

रात्रीचे दोन वाजले होते. सगळी कामी आटोपून आम्ही झोपलो होते. त्यावेळी शेजारी झोपला असलेल्या मुलाचा हात अचानक पांघरुणाच्या बाहेर निघाला होता. हा हात पाहून आम्ही झोपलो होतो  त्या ठिकाणी बिबट्या आला. बाळाला त्याने ओढण्याचा प्रयत्न केला तेवढ्यात हालचालीमुळे मला जाग आली आणि बिबट्या पाहून आणि त्याच्या तोंडात माझे मूल पाहून मनात धडकी भरली. मात्र बिबट्या जेवढ्या आक्रमक पद्धतीने आला तेवढ्याच आक्रमक पद्धतीने मी बिबट्यावर धावून गेले. एका हाताने मुलाला बिबट्याच्या जबड्यातून बाहेर काढले आणि एका हाताने बिबट्याला मागे सारण्याचा प्रयत्न केला. बिबट्याला पाहून जर घाबरले असते तर आज माझे मूल त्याने माझ्या डोळ्यादेखत खाल्ले असते, अशा शब्दांत सोनालीने तिचा बिबट्याशी झालेला संघर्ष सांगितला आहे. (The mother who rescued him from the jaws of the leopard recounted the thrill of the attack)

सोनाली तिच्या बाळासाठी बिबट्याशी लढली. त्यावेळी अनेकांनी आरडाओरड सुरू केली होती. कुटुंबातील बाकी सदस्यदेखील तोपर्यंत एकत्र आले होते. मात्र बिबट्याने सोनालीचा आक्रमक पवित्रा पाहून पळ काढला. या हल्ल्यात सात महिन्याच्या मुलाला थोडी इजा झाली आहे. त्यानंतर मुलाला आणि आई सोनल यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.  त्यानंतर लस देण्यात आली आहे. सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत या गावात तीन वेळा बिबट्याचा हल्ला झाला आहे. बिबट्याच्या हल्ल्यातून आज हे बाळ वाचलं मात्र यापुढे हल्ला झाला तर गावातील नागरिकांना धोका आहे. बिबट्याची दहशत कमी होण्यासाठी उपाययोजना राबवल्या जायला हव्यात, नाही तर असे अनेक जीव बिबट्याच्या भीतीने प्राण गमावतील, अशी भीती या बाळाच्या वडिलांनी व्यक्त केली आहे. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest