पुण्यात तृतीयपंथीयांचा पहिला ऐताहासिक दहिहंडी सोहळा, समानतेचा दिला संदेश
राज्यभरात आज दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. पुण्यातही मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या मंडळाकडून दहीहंडी गोपाळकाल्याचे आयोजन करण्यात आले होते. परंतु पुण्यात एक अनोखी दहीहंडी यावर्षी प्रथमच झाली असून या दहीहंडीमध्ये तृतीयपंथी गोविंदा पथकाने ही दहीहंडी फोडलेली आहे. या माध्यमातून समाजामध्ये समानतेचा संदेश देण्याचा प्रयत्न यावर्षीपासून पुण्यातून सुरू करण्यात आलेला आहे.
यावेळी तृतीयपंथी आपला भावना व्यक्त करताना आम्ही फक्त समाजाचे वेगळे घटक नाही तर समाजाचा एक भाग आहोत. त्यामध्ये आम्हाला ज्या संधी हव्या आहेत त्या संधी मिळत आहेत. यापेक्षा आम्हाला आणखी जास्त काही नको आहे. असेच आम्हाला समाधानी करावे यासाठी जे प्रयत्न सुरू झाले. पुण्यामध्ये त्यासाठी आम्ही खूप समाधानी आहोत. आम्ही जे काही ठरवले त्यापेक्षा खूप काही आम्हाला मिळाले. त्याच्या भावना आम्हाला आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी तृतीयपंथी गोविंदा पथकाने दिले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.