लोकशाहीचा सण लय मोठ्ठा भरून निघाला पीएमपीचा तोटा

राज्यात विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या धावपळीत सरकारी अधिकाऱ्यांबरोबरच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची वाहनेदेखील मोठ्या प्रमाणात वापरली गेली. जिल्ह्यातील ११ मतदारसंघात कर्मचारी, मतदान यंत्रे आणि इतर सामग्री पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) बसमधून करण्यात आली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 6 Dec 2024
  • 03:52 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

विधानसभा निवडणुकीत पीएमपीच्या गल्ल्यात २ कोटींची भर, पुणे, पिंपरी-चिंचवडमधील ९६८ गाड्या उपयोगात

राज्यात विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या धावपळीत सरकारी अधिकाऱ्यांबरोबरच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची वाहनेदेखील मोठ्या प्रमाणात वापरली गेली. जिल्ह्यातील ११ मतदारसंघात कर्मचारी, मतदान यंत्रे आणि इतर सामग्री  पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) बसमधून करण्यात आली. या माध्यमातून पीएमपीएमएलकडे  तब्बल २ कोटी ४ लाख ९६ हजार रुपये जमा झाले आहेत.

मतदान प्रक्रियेदरम्यान म्हणजेच गोदामातून मतदान सामग्री, कर्मचारी आणि इतर साहित्य विविध मतदार केंद्रांमध्ये पोहोचवण्यासाठी पीएमपीचा वापर करण्यात आला. त्यानंतर मधल्या वेळेमध्ये पुन्हा काही बसेस नियमित मार्गावर गेले होते. सायंकाळी पुन्हा त्या विविध केंद्रावरती बोलावण्यात आले. त्यामुळे जवळपास दिवसभर काही बसेस या मतदान प्रक्रियेसाठी अडकून पडल्या होत्या. एकूण मतदान प्रक्रियेसाठी पीएमपीच्या ९६८ बसगाड्यांचा वापर करण्यात आला. या बसगाड्यांचा उपयोग मुख्यतः निवडणूक कर्मचारी आणि ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) यांची ने-आण करण्यासाठी करण्यात आला.

पीएमपीच्या या विशेष सेवेमुळे एकूण अकरा मतदारसंघांमध्ये निर्बंध वाहतूक सेवा देण्यात आली. मतदारसंघांमध्ये वेगवेगळ्या केंद्रांवर कर्मचारी आणि मतदान यंत्रे पोहोचवण्यासाठी पीएमपीच्या व्यवस्थेचे कौतुक करण्यात आले आहे. विशेष काही केंद्रावरती रात्री उशिरापर्यंत मतदार प्रक्रिया सुरू होती. त्यानंतर पुन्हा निवडणूक अधिकाऱ्याकडून संबंधित सील होईपर्यंत बसेस तेथेच थांबून ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे पीएमपीच्या चालकही थांबून राहावे लागले होते . दरम्यान, निवडणूक आयोगाकडून या सेवेच्या बदल्यात पीएमपीला दोन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. निवडणुकीच्या कामामुळे पीएमपीला आर्थिकदृष्ट्या मोठा आधार मिळाला असून, बससेवेचा मतदान प्रक्रियेसाठी मोठा उपयोग झाला आहे.

पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात २९७ बस
विधानसभा निवडणुकांसाठी शहरातील २९७ पीएमपी बसची व्यवस्था करण्यात आली होती. या वाहनांचा वापर ईव्हीएम मशिन तसेच निवडणूक कर्मचारी अधिकारी यांना मतदान केंद्रावर पोहोचविण्यासाठी करण्यात आला. यामुळे काही लांबच्या पल्ले असलेल्या मार्गावरती बस सोडण्यात आली नव्हती. यात  भोसरी  ११५,  पिंपरी   ७१ आणि  चिंचवड ११५ बसेस देण्यात आल्या होत्या.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest