महाराष्ट्र फार्मसी ग्रुपतर्फे एमपीएससी परीक्षेतील यशवंतांसह फार्मसी क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा तसेच फार्मसी क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा सन्मान महाराष्ट्र फार्मसी ग्रुपतर्फे सन्मान करण्यात आला. यावेळी नागरी सेवा, कम्युनिटी फार्मसी, अकादमी आणि फार्मास्युटिकल उद्योगातील फार्मासिस्टना एकत्र आणण्याचे काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Avchite
  • Wed, 9 Oct 2024
  • 06:48 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा तसेच फार्मसी क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र फार्मसी ग्रुपतर्फे (Maharashtra Pharmacy Group) सन्मान करण्यात आला. यावेळी नागरी सेवा, कम्युनिटी फार्मसी, अकादमी आणि फार्मास्युटिकल उद्योगातील फार्मासिस्टना एकत्र आणण्याचे काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आले.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अन्न व औषध प्रशासन विभागा माजी  आयुक्त महेश झगडे, कोकणचे माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, पुण्याचे आयकर आयुक्त डॉ. नितीन वाघमोडे, उद्योजक अभयसिंह जगताप आदी उपस्थित होते. सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी फार्मासिस्टचे योगदाने मोठे आहे. राज्यात दोन हजार औषध निरीक्षक पदे भरणे अत्यावश्यक आहे. असे मी आयुक्त असताना राज्य शासनाला कळविले होते. फार्मसी क्षेत्राकडे दुर्लक्ष करू नये. फार्मासिस्ट हाच खरा रुग्णाचा मित्र आहे. असेही ते होते. असे झगडे यांनी यावेळी सांगितले. या प्रसंगी  स्पर्धा परीक्षा क्षेत्र, कम्युनिटी फार्मसी, अध्यापन आणि फार्मास्युटिकल उद्योगात ठसा उमटवणाऱ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक आदित्य वगरे यांनी फार्मासिस्टसाठी केवळ औषधोपचारच नव्हे तर आरोग्यसेवा धोरण तयार  करावे तसेच आरोग्यसेवा व्यावसायिकांच्या भावी पिढीला शिक्षित करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घ्यावा, अशी भूमिका मांडली.

ग्रुपतर्फे प्राचार्य बी. एस. कुचेकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिक्षण, उद्योग क्षेत्रातील डॉ. चंद्रशेखर बोबडे, वैभव शिळीमकर, सागर पायगुडे यांचा सन्मान करण्यात आला. एमपीएससीच्या राज्यसेवा २०२२ परीक्षेत एनटीसी प्रवर्गात राज्यात प्रथम आलेले हनमंत बनगर,  राज्यसेवेत २०२३ परीक्षेत राज्यात प्रथम आलेले डॉ. महेश घाटुळे, पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत राज्यात प्रथम आलेले अमोल घुटुकडे, सचिन टेकवडे, अविनाश कोल्हे, कमलेश निरंजने, मयूरी सूर्यवंशी, चेतन पानसरे,  ज्ञानेश्वरी दातीर  आदी अधिकाऱ्यांचा कौतुक सोहळा रंगला. 'फार्मासिस्ट डे'निमित्त ग्रुपने राष्ट्रीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. सूत्रसंचालन प्रा. अश्विनी बनकर व प्रा. गुणवंत अवचर यांनी केले.  सूरज हांगे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वप्नील कदम, किरण लोखंडे, दीपक राणे, माधुरी गलगुंडे, पंकज धनवे यांनी परिश्रम घेतले. 

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest