विजयादशमीला पुण्यात 58 स्थानांवर संघाचे सघोष पथसंचलन

पुणे: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पुणे महानगराच्या वतीने विजयादशमी दिनी शनिवारी (ता.12) 58 ठिकाणी सघोष पथसंचलन आयोजित करण्यात आले आहेत. संघ दृष्ट्या महानगरातील नऊ भागांमध्ये पूर्ण गणवेशात स्वयंसेवकांचे हे शिस्तबद्ध संचलन होणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 9 Oct 2024
  • 03:24 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

पुणे: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पुणे महानगराच्या वतीने विजयादशमी दिनी शनिवारी (ता.12) 58 ठिकाणी सघोष पथसंचलन आयोजित करण्यात आले आहेत. संघ दृष्ट्या महानगरातील नऊ भागांमध्ये पूर्ण गणवेशात स्वयंसेवकांचे हे शिस्तबद्ध संचलन होणार आहे. 

दरम्यान संपूर्ण महानगरातील ही संचलने सुरू होण्याआधी प्रथेप्रमाणे शिवाजीनगर भागातील एसएसपीएमएस शाळेच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सघोष मानवंदना देण्यात येणार आहे. तिथे शंख व भगव्या ध्वजाचे पूजन करून संचलनाला प्रारंभ होईल. 

विजयादशमीच्याच दिवशी नागपूरातील मोहिते वाड्यात 1925 मध्ये संघाची स्थापना झाली होती. त्यामुळे दरवर्षी विजयादशमीला संघाचे स्वयंसेवक देशभरात पथसंचलनांचे आयोजन केले जाते . यंदा संघ शताब्दी वर्षात प्रवेश करत असल्याने पथसंचलनांना एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.  बहुतेक स्थानांवर सकाळी तर काही नगरांत संध्याकाळी पथसंचलन होणार आहेत. 

घोषाच्या वादनात शिस्तबद्ध पद्धतीने पार पडणारे हे संचलन केवळ स्वयंसेवकांमध्ये नाही तर नागरिकांमध्येही राष्ट्रभक्तीची भावना जागृत करते. संचलनाद्वारे विविध महापुरूषांनाही अभिवादन करण्यात येते. 58 संचलनांच्या माध्यमातून महानगरातील हजारो स्वयंसेवक पूर्ण गणवेशात सहभागी होत आहे. नुकतेच शस्त्रपूजनाचा उत्सवही प्रत्येक भागात पार पडले.  

संघाच्या सहा उत्सवांपैकी विजयादशमी एक प्रमूख उत्सव आहे. याच दिवशी नागपूरात होणारे सरसंघचालकांचे उद्भोदन संघाच्या आगामी वाटचालीची आणि स्वयंसेवकांच्या कार्याची दिशा स्पष्ट करते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest