शिरगाव येथे घराजवळ आढळला 10 फुटी अजगर; वन्यजीव रक्षक मावळ संस्थेकडून जीवदान

शिरगाव येथील वस्तीमध्ये १० फूटी अजगर आढळला. हा अजगर सूरज भोसले यांना दिसला. त्यांनी याबाबतची माहिती वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सभासद संतोष गोपाळे यांना दिली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 9 Oct 2024
  • 05:46 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

शिरगाव येथे घराजवळ आढळला 10 फुटी अजगर; वन्यजीव रक्षक मावळ संस्थेकडून जीवदान

शिरगाव येथील वस्तीमध्ये १० फूटी अजगर आढळला. हा अजगर सूरज भोसले यांना दिसला. त्यांनी याबाबतची माहिती  वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सभासद संतोष गोपाळे यांना दिली. हा अजगर लोकवस्तीच्या जवळ असल्यामुळे संतोष गोपाळे यांनी याची माहीती वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे यांना दिली आणि या अजगरला  सुरक्षित रेस्क्यु केले.

जिगर सोलंकी, निनाद काकडे, सर्जश पाटील यांनी अजगराची तपासणी केली. हा अजगर स्वस्थ असल्याची माहिती वनविभाग वडगाव वनपाल एम . हिरेमठ यांना देण्यात आली.

अजाराबद्दल तिथल्या स्थानिक लोकांना माहिती दिली. यावेली स्थानिकांनी कोणातही साप न मारण्याचे आश्वासन दिले. 

इंडियन रॉक पायथन (भारतीय अजगर) हा एक बिनविषारी जातीचा साप आहे. हा साप १५-१७ फुटापर्यंत वाढू शकतो. मावळात आता पर्यंत १५ फुटाचा अजगर आढळून आला आहे. वनविभाग आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या मदतीने या सापांना सुरक्षित रीतीने जंगलात सोडण्यात आले आहेत. अजगर सापाचे खाद्य छोटे भेकर, ससे, घुस व इतर प्राणी असते. कोणता ही वन्य प्राणी जखमी आढळल्यास त्वरित वनविभाग किंवा जवळच्या प्राणीमित्रला कळवावे.
- रौनक खरे, प्राणी अभ्यासक, वन्यजीव रक्षक मावळ संस्था 

कोणता ही वन्यप्राणी जखमी अवस्थेत आढळल्यास जवळपास च्या प्राणीमित्राला किंवा वनविभागाला संपर्क (१९२६) करावा असे आवाहन वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे आणि अध्यक्ष अनिल आंद्रे यांनी लोकांना केले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest