पुणे : बॅंक पथकाने केली ९ कोटी रुपयांची वसूली महापालिकेच्या कर संकलन विभागाकडून मोहिम

पु्णे महापालिकेच्या कर आकरणी व कर संकलन विभागाने शहरातील मिळकतदारांना कर भरण्याचे आवाहन केले आहे. परंतु ज्या मिळकतदारांकडून कर थकबाकी भरण्यास टाळाटाळ केली जात आहे

PMC News

पुणे : बॅंक पथकाने केली ९ कोटी रुपयांची वसूली महापालिकेच्या कर संकलन विभागाकडून मोहिम

पुणे : पु्णे महापालिकेच्या कर आकरणी व कर संकलन विभागाने शहरातील मिळकतदारांना कर भरण्याचे आवाहन केले आहे. परंतु ज्या मिळकतदारांकडून कर थकबाकी भरण्यास टाळाटाळ केली जात आहे, अशा मिळकतदारांच्या घरासमोर बॅंड वाजवला जात आहे. त्यासाठी विभागाने बॅंड पथक नेमले असून या पथकामुळे ९ कोटी २२ हजार ६१२ रुपये  थकबाकी वसूल करण्यास यश मिळाले आहे.

कर संकलन विभागाने शहरातील मिळकतदारांची थकबाकी वसूली करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे.  या बॅंड पथकामार्फत  १५ क्षेत्रिय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील थकबाकी असलेल्या मिळकतीवर थकबाकी वसुलीची कारवाई हाती घेण्यात आलेली आहे. त्यानुसार दिनांक २ ते ४ डिसेंबर या तीन दिवसांत बँड पथकाद्वारे व मध्यवर्ती पथकाद्वारे १५४ इतक्या मिळकतींना भेट देण्यात आली. त्यांच्याकडून नऊ कोटी २२ हजार ६१२ रुपये कर वसुली करण्यात आली आहे. तसेच १९ मिळकती सिलबंद करण्यात आलेल्या आहेत. पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात सुमारे १४ लाख ८० हजार मिळकती असून, त्यापैकी सुमारे ८ लाख ७३ हजार २५७ मिळकत धारकांनी त्यांचा मिळकत कर रक्कम १ हजार ७९८ कोटी इतका जमा केला आहे.

कर आकारणी व कर संकलन खात्याने सन २०२४-२५ चे उद्दिष्ट पूर्ततेच्या अनुषंगाने थकबाकी वसुलीमध्ये मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रित केलेले आहे. मिळकत कर वसुलीसाठी बँड पथकाचा समावेश असलेले स्वतंत्र वसुली पथके तयार करण्यात आलेली आहेत. उर्वरित मिळकत कर थकबाकी धारकांकडे या पुढील कालावधीमध्ये मोठ्‌या प्रमाणात थकबाकी वसुली करण्यासाठी या पथकांमार्फत मिळकत कर वसुलीचे काम करण्यात येणार आहे. तरी ज्या मिळकत धारकांनी अद्यापही कराचा भरणा केलेला नाही, त्यांनी लवकरात लवकर मिळकत कर भरावा, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा कर आकारणी व कर संकलन विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी दिला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest