बांबूची कलाकारी...
झपाट्याने बदलणाऱ्या काळातही बांबूच्या नानाविध वस्तूंचं महत्त्व कमी झालेलं नाही. आजही तरुणाईपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व लोक बांबूच्या वस्तूंचा आग्रह धरतात. टोपल्या, सूप, केरसुणी, चटई अशा विविध गोष्टी तयार होताना पाहण्यासाठी अनेक लोक बुरुड आळीत जातात. आता पारंपरिक वस्तूंसोबतच फॅशनेबल नाईट लॅम्पसारख्या अनेक नावीन्यपूर्ण वस्तूही दिसतात. मंडईच्या जवळ असलेला हा भाग बांबूच्या कलाकृतींसाठी प्रसिद्ध आहे.