टँकरच्या धडकेत जेष्ठ महिलेचा मृत्यू
पुण्यातील कात्रज-कोंढवा रस्त्यावरील स्मशानभूमीजवळ ४ दिवसांपुर्वीच ४ ते ५ वाहनांचा विचित्र अपघात होता. या अपघातात विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस, ट्रक, टिप्पर आणि इतर वाहने एकमेकांवर आदळून एकाचा मृत्यू झाला होता. आता पुन्हा एकदा कात्रज-कोंढवा रस्त्यावर रविवारी रात्री (ता. १३) अपघात झाला. माऊली नगर चौकात टँकरने दिलेल्या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीसांनी कार चालकाला ताब्यात घेतले आहे.
प्रभावती पांडुरंग अनभुले (वय ७० रा. विग्नहर्तानगर) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खाजगी कार्यालयात एका कार्यक्रमासाठी ही महिला गेली होती. कार्यक्रम संपून घरी माऊली नगरकडे जात असताना मुख्य रस्त्यावर टँकरने उडवले. या अपघातात सदर महिलेचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
दहाच्या सुमारास भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने पादचारी महिलेला उडविले. अपघातानंतर ट्रकचालक ट्रक घेऊन पळून जात होता. भारती विद्यापीठ पोलिसांनी त्याला ट्रकसह कोंढवा पोलिस स्टेशनच्या हद्दीत ताब्यात घेतले. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत. दरम्यान, गेल्या आठवड्यात झालेल्या दोन अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता तसेच पाच जण गंभीर जखमी झाले होते. आता या आठवड्यातील तिसऱ्या अपघाताची नोंद झाली आहे. या रस्त्यावरी अपघातामुळे नागरिक चांगलेच संतापले आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.