Pune : सिध्दार्थनगर वासियांचा 14 वर्षांचा वनवास अखेर संपला, हक्काचे घर देण्याचे शासनाचे आदेश

सिध्दार्थनगर (विमाननगर) येथील व्हीआयपी रस्ता रुंदीकरणामुळे विस्थापित झोपडपट्टीधारकांना निशुल्क स्वरुपात घरे देण्याचे आदेश ग़ृहनिर्माण विभागाने झोपडपट्टी पुर्नवसन प्राधिकरणाला दिले आहेत.

Pune : सिध्दार्थनगर वासियांचा 14 वर्षांचा वनवास अखेर संपला, हक्काचे घर देण्याचे शासनाचे आदेश

सिध्दार्थनगर वासियांचा 14 वर्षांचा वनवास अखेर संपला, हक्काचे घर देण्याचे शासनाचे आदेश

आमदार सुनिल टिंगरे यांच्या प्रयत्नांना यश

पुणे : राष्ट्रकुल युवा स्पर्धेसाठी वडगाव शेरी मतदार संघातील सिध्दार्थनगर (विमाननगर) येथील व्हीआयपी रस्ता रुंदीकरणामुळे विस्थापित झोपडपट्टीधारकांना निशुल्क स्वरुपात घरे देण्याचे आदेश ग़ृहनिर्माण विभागाने झोपडपट्टी पुर्नवसन प्राधिकरणाला दिले आहेत. त्यामुळे सिध्दार्थनगर वासियांचा 14 वर्षांचा वनवास अखेर संपला आहे.

वडगाव शेरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनिल टिंगरे यांनी यासंबधीची माहिती दिली. पुण्यात 2009 मध्ये झालेल्या राष्ट्रकुल युवा स्पर्धेसाठी सिध्दार्थनगर (विमाननगर) येथुन जाणार्‍या व्हीआयपी रस्त्याचे रुंदीकरण महापालिकेने केले होते. त्यासाठी अनेक झोपड्या काढाव्या लागल्या होत्या. संबंधित बाधितांना घरे देऊन त्यांचे पुर्नावसन करण्याचे आश्वासन महापालिकेने दिले होते. मात्र, आत्तापर्यंत त्यांना हक्काची घरे मिळू शकली नव्हती. यासंदर्भात आमदार सुनिल टिंगरे यांनी विधी मंडळ अधिवेशनात संबधीचा प्रश्न उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले होते.

तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तसेच महापालिका आणि एसआरएकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. आमदार टिंगरे यांच्या या प्रयत्नांना अखेर यश आले असून गृहनिर्माण विभागाने या रस्ता बाधित झोपडपट्टीधारकांना त्यांच्या पसंतीची 169 उपलब्ध करून द्यावीत असे आदेश एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटने यांना दिले आहेत. त्यासाठी पुणे महापालिकेने त्यांच्या ताब्यातील विमाननगर येथील घरे उपलब्ध करून द्यावीत असेही या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे आता सिध्दार्थनगर वासियांना हक्काचे घर मिळणार आहे.

वडगाव शेरी मतदारसंघाचे आमदार सुनिल टिंगरे म्हणाले की, एक लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ न देता मी कायम जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन ते सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहिलो. सिध्दार्थनगर मधील रहिवाशांना घर मिळाल्याचे आदेश आल्यानंतर त्यांच्या चेहर्‍यावरील आनंद पाहून आपण केलेल्या प्रयत्नांचे फळ  मिळाल्याचे समाधान वाटले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे यासाठी मोलाची मदत झाली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest