पुण्यातील सदनिकाधारकांना करमाफी देण्यार का? आमदार कांबळेंच्या प्रश्नाला मंत्री सामंतांचे उत्तर
सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात आज (दि. २१) पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनिल कांबळे यांनी लक्षवेधी सूचना मांडताना सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील ५०० स्क्वेअर फूटापेक्षा कमी असलेल्या सदनिकाधारकांना करमाफी देण्यात येणार का? असा प्रश्न कांबळे यांनी उपस्थित केला आहे.
आमदार कांबळे यांनी पावासाळी अधिवेशनात सदनिकांचा प्रश्न उपस्थित करताना म्हटले की, पुणे महापालिकेच्या हद्दीतील ५०० स्क्वेअर फूटापेक्षा कमी असलेल्या हजारो प्रॉपर्ट्या आहेत. या प्रॉपर्ट्यांचा जवळजवळ सात ते आठ हजार कोटी रुपयांचा टॅक्स वसूल करणे बाकी आहे. मात्र, हा टॅक्स वसूल करण्यासाठी महापालिकेची कुठलीही यंत्रणा नाही. तसेच भाड्याने देण्यात आलेल्या महापालिकेच्या प्रॉपर्ट्यांचा टॅक्स वसूल करून घेण्यात यावा, अशी आमची मागणी आहे. ज्या५०० स्क्वेअर फूटापेक्षा कमी सदनिकाधारक आहेत त्यांना आपण करमाफी देण्यात येणार का? असा प्रश्न कांबळे यांनी उपस्थित केला आहे.
यावर उत्तर देताना मंत्री उदय सामंत म्हणाले की, जो प्रश्न कांबळे यांनी उपस्थित केला आहे. या संदर्भात अनेक लोकांनी हाच मुद्दा मांडलेला आहे. पण मी सांगू इच्छितो की, यासाठी कुठलेही प्रचलित धोरण नाही. नविन गावांचा आणि अतिरिक्त कराचा जो मुद्दा आहे, यासंदर्भात अहवाल मागवून त्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे उत्तर सामंत यांनी दिले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.