पुण्यातील उंड्रीमध्ये टँकरची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू
पुण्यातील हांडेवाडीकडून उंड्री चौकाकडे भरधाव वेगाने येणाऱ्या पाण्याच्या टँकरने दुचाकीला धडक दिली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात सकाळी ७ च्या सुमारास घडला आहे.
एन वनलाल पेका (रा. शिवनेरी नगर गल्ली नंबर १२, कोंढवा खुर्द, पुणे) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. तर एडवर्ड (रा. शिवनेरी नगर गल्ली नंबर १२, कोंढवा खुर्द, पुणे) हे जखमी झाले असून त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ७ वाजता दुचाकी क्रमांक MH-12-CP-8996 वरून दोघेजण हांडेवाडीहून उंड्रीकडे जात होते. यावेळी भरधाव वेगात आलेल्या पाण्याच्या टँकर क्रमांक MH 11 AL 2450 ने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्याला रुग्णवाहिकेतून ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातले नसल्याचे सांगण्यात येत आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.